Viral video: आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. पोहणे हा सर्वांच्याच आवडीचा छंद आहे. पाणी दिसलं की, पोहण्याची इच्छा होणार नाही अशा व्यक्ती विरळाच. त्यातून स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद वेगळाच. मात्र, मजा-मस्ती करताना स्वत:ची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये खासगी मालकीच्या रिसॉर्टमध्ये गेलेल्या तीन तरुणींचा स्विमिंग पूलमध्ये एकाच वेळी मृत्यू झाला. या दुर्घटनेचा व्हिडीओही सध्या समोर आला असून, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
फिरायला आलेल्या तिघींचा एकाच वेळी मृत्यू
मंगळुरूमध्ये एका खासगी मालकीच्या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूलमध्ये बुडून तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना घडली ते रिसॉर्ट मंगळुरूच्या उचिला बीचजवळ आहे. निशिता एमडी (वय २१), पार्वती (२०) व कीर्तना (२१) अशी या मुलींची नावे आहेत. या धक्कादायक प्रकराने मुलींच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या तिन्ही मुली म्हैसूरच्या असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की, मृत्यू कसा एखाद्याला जाळ्यात ओढतो.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहता येत नसलेली निशिता तलावात शिरली तेव्हा ही दुर्घटना घडली. पार्वतीनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघीही बुडू लागल्या. त्यानंतर कीर्तनानं मदतीसाठी उडी घेतली; पण दुर्दैवानं तिघींचाही बुडून मृत्यू झाला. त्यांच्यापैकी कोणालाही पोहायला येत नव्हतं आणि दुर्घटनेच्या वेळी कर्तव्यावर कोणीही जीवरक्षक नव्हता. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तरुणी स्वत:ला वाचवण्याचा आणि मदतीसाठी हाका मारण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहेत; परंतु त्यांच्या ओरडण्याला कोणीही प्रतिसाद देताना दिसले नाही. फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, पूलच्या आजूबाजूचा परिसर निर्जन होता.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: एक चुकीचं पाऊल अन् रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; समुद्रात बोटीवर चालता चालता तरुणाबरोबर भयंकर घडलं
घटनास्थळी भेट दिलेले मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी महिलांचा मृत्यू अपघाती बुडून झाल्याची पुष्टी केली. त्यांनी रिसॉर्टच्या सुरक्षेच्या उपायांमधील महत्त्वपूर्ण त्रुटींवर आक्षेप घेत, रिसॉर्टमध्ये सात कर्मचारी कर्तव्यावर असूनही, कोणत्याही कर्मचाऱ्यानं परिस्थितीला प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं नाही म्हणून अधिकाऱ्यांनी रिसॉर्ट सील केलं आहे. रिसॉर्टचा व्यापार परवाना आणि इतर पर्यटनसंबंधित परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. भविष्यातील सुरक्षा त्रुटी टाळण्यासाठी उल्लाल पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.