Lion fight video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स , भांडण यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. याशिवाय वन्य प्राण्यांशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. तुम्हाला माहितच असेल की, हे वन्य प्राणी किती खतरनाक असतात. ते कधी कोणावर हल्ला करतील सांगता येत नाही.जंगलचा राजा सिंहाला माणसं काय तर अगदी जंगलातील प्राणीही घाबरतात. कोणीही त्याच्या पुढ्यात न जाणंच पसंत करतो. आजकाल सोशल मीडियावर पाळीव किंवा जंगली प्राण्यांचे व्हिडीओ अधिक पाहायला मिळतात. असे व्हिडीओ फार वेगाने व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये चक्क तीन सिंह एकमेकांसोबत झुंज करताना दिसत आहेत.
सिंहाचं नाव जरी काढलं तरी भल्याभल्यांच्या अंगाचा थरकाप उडतो. त्याची गर्जना जरी ऐकली तरी जंगालचे प्राणी सैरावरा धावतात. पण हेच सिंह जर एकमेकांना भिडले तर ही लढाई एखाद्या घनघोर युद्धापेक्षाही कमी नसते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडीओमध्ये सिंहच आपापसात लढत असल्याचं दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तिन सिंहांची झुंज पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारा येईल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिन सिंह एकमेकांना भिडत आहेत आणि तिनही सिंह रक्तबंबाळ अवस्थेत आहेत. तिन सिंह संघर्ष करत होते. बघता बघता दोन सिंहांची तुंबळ लढाई सुरू झाली. पहिला सिंह दुसऱ्यावर आक्रमण करतो, तर दुसरा सिंह काही मागे हटण्याचं नाव घेत नाही. दोघांमध्ये झटापट होते. या झटापटीत एक सिंह जमिनीवर पडतो. त्यानंतर दुसराही खाली पडतो रक्तबंबाळ अवस्थेत कोणा एकाचा शेवट नक्की आहे असं या व्हिडीओवरुन दिसत आहे कारण कुणीही माघार घ्यायला तयार नसून अक्षरश: एकमेकांना त्यांनी फाडलं आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ latestkruger नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तरअनेक लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. दोन सिंहांमधली संघर्षाची लढाई पहिल्यांदा पाहिली असल्याची भावना देखील काही युजर्सनी व्यक्त केली आहे. तर काही युजर्स म्हणाले, “ “आयुष्य कुणाचंच सोपं नाही” जंगलात राहयचं तर शिकार करो या शिकार बनो”.