उंच इमारतीत राहणाऱ्या लोकांसाठी लिफ्ट अगदीच महत्त्वाची आहे. चार मजल्यांच्या इमारती असतील, तर तुम्ही जिन्यावरून चालत जाऊ शकता. पण, पाचपेक्षा जास्त मजल्यांच्या इमारतींना लिफ्टने जाण्याशिवाय काही पर्याय नसतो. आज सोशल मीडियावर एक लिफ्ट संबंधित व्हिडीओ व्हायरल होत आहे. तीन माणसं हातात छोले-भटुरे या पदार्थांची प्लेट घेऊन लिफ्टमध्ये चढताना दिसतात आणि अचानक लिफ्ट बंद पडते. जेव्हा यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यात येते तेव्हा तिघांपैकी एक जण छोले-भटुरेला पहिलं प्राधान्य देतो; जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
सोशल मीडियावर नोएडाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नोएडाच्या एका इमारतीत तीन माणसं अडकली आहेत. हे तिन्ही जण प्लेटमध्ये छोले भटुरे घेऊन त्यांच्या घरी जात असतात. तितक्यात अचानक लिफ्ट बंद पडते आणि या तिन्ही व्यक्ती लिफ्टध्ये अडकून राहतात. तसेच १५ मिनिटे हे सर्व जण असेच लिफ्टमध्ये अडकून असतात आणि त्यानंतर इमारतीतील रहिवाशांच्या मदतीनं लिफ्ट उघडून त्यांना बाहेर काढण्यात येते. तर लिफ्टमधून बाहेर काढताना या तीन जणांमधील एक व्यक्ती मजेशीर कृत्य करते. व्यक्ती नेमकं काय करते एकदा तुम्हीसुद्धा पोस्टमधून बघा…
हेही वाचा… ‘भूपेंद्र जोगी’ नाव सांगत ग्राहकाने केला मेसेज! झोमॅटो कंपनीनेही दिले मीमसह उत्तर…
व्हिडीओ नक्की बघा :
पहिल्यांदा माझी छोले-भटुरेची प्लेट पकडा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, तीन व्यक्ती लिफ्टमध्ये अडकलेल्या असतात. त्यांना लिफ्टमधून बाहेर काढण्यासाठी काही रहिवासी मदतीला येतात. तिन्ही व्यक्तींच्या हातामध्ये छोले-भटुरे या पदार्थांची प्लेट असते. एक व्यक्ती लिफ्टमध्ये अडकलेल्या एका माणसाला उतरण्यासाठी हात देते तेव्हा सुरुवातीला तो हातातली प्लेट व्यक्तीजवळ देतो आणि म्हणतो “पहिल्यांदा माझी छोले-भटुरेची प्लेट पकडा” हे ऐकताच तिथे उपस्थित सगळेच हसायला लागतात. व्यक्तीचे स्वतःपेक्षा जास्त छोले-भटुरेवर प्रेम असते, असे म्हणायला हरकत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @sachinguptaUP या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक जण व्हिडीओ पाहून मजेशीर कमेंट्स करताना दिसून येत आहेत. एक युजरने कमेंट केली आहे की, १५ मिनिटांत लिफ्टमध्ये बसून छोले-भटुरे खाऊन झाले असते. तर दुसरा युजर म्हणतो आहे की, छोले-भटुरे खूपच आवडतात वाटतं. प्लेट फेकूनसुद्धा दिली नाही. तसेच एवढा वेळ लिफ्टमध्ये अडकूनसुद्धा व्यक्तीनं छोले-भटुरे खाण्याची इच्छा सोडली नाही, अशा कमेंट्स काही जण करताना दिसत आहेत.