चोरी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे पकडले गेल्यास तुम्हाला गंभीर शिक्षा होऊ शकते. मात्र, तरीही काही जण झटपट पैसा कमावण्यासाठी गुन्हेगारीचा रस्ता निवडतात. यामुळे दररोज कार आणि बाइकचोरीच्या घटना सर्रास घडताना दिसतात. त्यासाठी चोर वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. अशाच प्रकारे एका व्यक्तीने घरासमोर उभी केलेली दुचाकी भरदिवसा एक चोर घेऊन पसार झाल्याची घटना समोर आली आहे. चोराने अवघ्या १० सेकंदांत ही बाइक घरासमोरून पळवली. या बाइकचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

घरासमोरून पळून नेली बाईक

अशी चोरीची घटना तुम्ही आजवर चित्रपटातसुद्धा पाहिली असेल. पण, पंजाबमधील फिरोजपूरमध्ये लोकांच्या डोळ्यांदेखत बाइकचोरीची ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण एका बाइकवरून आले आणि रस्त्याच्या कडेला एका घरासमोर उभ्या असलेल्या एका बाइकजवळ येऊन थांबले. त्यावेळी त्या बाइकवरील एक तरुण खाली उतरतो आणि तो एका घरासमोरील चावीसह उभी असलेली बाइक स्टार्ट करतो आणि तिथून पसार होतो. ही घटना घडल्याचे लक्षात येताच घरातील लोक बाहेर येता तेव्हा बाइकवरून आलेले चोर गोळीबार करताना दिसत आहेत. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @Gagan4344 या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, सावध राहा! अशा प्रकारे काही सेकंदांत चोरी होते. हे सीसीटीव्ही फुटेज फिरोजपूरचे आहे. दरम्यान, शेकडो युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी चोरीचा हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे.

Story img Loader