Tigers Attack On Safari Vehicle : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जंगल सफारीच्या एका व्हिडीओमुळं खळबळ उडाली आहे. बिबट्या,वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी मानवी वस्तीत मुक्त संचार करून माणसांवर हल्ला करत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. रस्त्यावरून प्रवास करताना किंवा जंगलात भटकत असताना वन्य प्राणी माणसांवर जीवघेणा हल्ला करतात. तसेच राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास हे प्राणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. जंगल सफारीचा अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. जंगल सफारी करताना सफारी वेहिकलवर तीन वाघांनी झडप घेतली. वाघांनी सफारी वेहिकलवर झेप घेताच पर्यटकांचा थरकाप उडाला. वाघांचा व्हायरल झालेला व्हिडीओ पेंच नॅशनल पार्क येथील असल्याचं समजते.
वाघांचा धक्कादायक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. एका सफारी वेहिकलमध्ये बसून काही पर्यटक जंगल सफारी करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. पण पर्यटकांचे सफारी वेहिकल वाघांच्या गुहेजवळ जाताच तीन वाघांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वाघ वेहिकलवर झेप घेऊन खिडक्यांमधून आत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सफारी वेहिकलवर वाघांनी झेप घेतल्यानंतर पर्यटकांना धक्का बसला. वाघ गाडीच्या जवळ आल्यावर पर्यटकांनी कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा केला नाही. पर्यटक वाघांनी पाहून थक्क झाले आणि वेहिकलमध्ये शांत बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. सुदैवाने या वाघांनी झेप घेतल्यानंतर खिडक्या तोडून वेहिकलमध्ये प्रवेश केला नाही. अन्यथा वाघांनी पर्यटकांवर हल्ला केला असता.
इथे पाहा व्हिडीओ
वाघांचा हा थरकाप उडवणारा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय,” जर या वाघांनी खिडकी तोडली असती किंवा बसमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली असती, तर काय घडलं असतं याची आपण कल्पनाही करु शकत नाही.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “वाघ तुम्हाला पाहत होते की तुम्ही वाघांना पाहत होता?”. अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, “तुम्ही पिंजऱ्यातून वाघांना पाहत आहात आणि वाघ बाहेर फिरत आहेत.” वाघांच्या हल्ल्यात माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडला आहेत. त्यामुळे जंगल सफारी करताना किंवा रानावनात भटकताना पर्यटकांनी वाघांच्या जवळ जाऊ नये. जंगलातील नियमांचे पालन करावे, अशा सूचना वनविभागाकडून पर्यटकांना दिल्या जातात.