wild boar attacked on leopard video: रानावनात भटकणाऱ्या वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांचे हरण, डुक्कर, झेब्रा, ससा आदी प्राणी शिकार होत असतात. पण कधी कधी या प्राण्यांच्याही शिकारीचा डाव फसतो आणि शिकाऱ्याचीच शिकार होते. कारण एकीचे बळ या कथेप्रमाणे छोटे मोठे प्राणी मिळून जेव्हा हिंस्र प्राण्यांवर हल्ला करतात. त्यावेळी ते किती आक्रमक असतात याचा अंदाजही लावणं कठीण आहे. असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रानडुक्करांची शिकार करायला आलेल्या बिबट्याचीच फजिती झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. तीन रानडुक्कर बिबट्याला चावा घेतानाचे थरारक दृष्य कॅमेरात कैद झाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.

अन् बिबट्याला रानडुक्करांनी रस्त्यावरच घेरला

शिकारीच्या शोधात आलेला एक बिबट्या घाटरस्त्यातून जात असताना तीन रानडुक्करांच्या तावडीत सापडतो. एरव्ही बिबट्याला घाबरून पळणारे रानडुक्कर या बिबट्याला मारण्यात मात्र कंबर कसताना या व्हिडीओत दिसत आहेत. घाटरस्त्यात बिबट्याला खाली पाडून त्याच्यावर हल्ला करताना हे रानडुक्कर व्हिडीओत दिसत आहेत. बिबट्याला धारदार दाताने चावा घेतानाही रानडुक्कार व्हिडीओत दिसत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाने कार थांबवून प्राण्यांच्या हल्ल्याच्या हा थरार कॅमेरात कैद केला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा येईल, कारण बिबट्यावर रानडुक्करांनी एवढा खतरनाक हल्ला केल्याचं याआधी क्वचितच पाहिलं असेल.

Crocodiles nanded news in marathi
दगडांच्या कपारीतून मगर पकडली
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
leopard Milkman bike video
दुचाकीस्वार अन् बिबट्याची जोरदार धडक; रस्त्यात कोसळला अन् पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा, भयानक VIDEO व्हायरल
Accidents caused by protection or hunting of wild boars in Palghar taluka
शहरबात : रानडुक्कर आणि दुर्घटना
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
Tiger cub and wild boar fall into same well after chase goes wrong in MadhyaPradesh's Seoni shocking video
“जास्त गर्व करू नये कारण…पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा” वाघावर काय वेळ आली पाहाच; VIDEO व्हायरल
विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral

नक्की वाचा – Video: शाळेतील वर्गातच शिक्षिकेनं विद्यार्थ्यासोबत केला भन्नाट डान्स, ठुमके पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

इथे पाहा व्हिडीओ

हा थरारक व्हिडीओ फॉरेस्ट अॅनिमल्स नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हजारोंच्या संख्येत या व्हिडीओला लाईक्स मिळाले असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत. मानवी वस्तीत मुक्त संचार करुन माणसांचीही शिकार करणारा बिबट्या रानडुक्करांची शिकार होताना या व्हिडीओत दिसत आहे. तीन रानडुक्करांनी मिळून बिबट्यावर हल्ला केल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात छोटे प्राणी मरण पावतात. पण बिबट्याचीही शिकार केली जाऊ शकते, हे या रानडुक्करांनी दाखवून दिलं आहे. हा थरारक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा वर्षावही होत आहे.

Story img Loader