Ratnagiri Viral video:  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत चिपळूणमधील बहादूरशेख नाका येथील उड्डाणपुलासंदर्भातील दुर्घटनांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही, शुक्रवारी सायंकाळी या उड्डाणपुलाच्या एका पिलरचे पाडकाम सुरू होते. त्यावेळी पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली; ज्यात तीन कामगार गंभीररीत्या जखमी झाले. या दुर्घटनेचे एक अतिशय भीतीदायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दुर्घटनेनंतरचा एक धक्कादायक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. त्यात दिसतेय की, पुलाचा पिलर कोसळल्यानंतर एका जखमी कामगाराला उचलून रुग्णालयात नेले जात आहे. तसेच, दुसरीकडे कोसळलेल्या पुलाच्या खांबातील सळ्यांमध्ये अडकलेल्या एका कामगाराची क्रेनच्या मदतीने सुटका केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा हे काम सुरू असताना कामगारांच्या आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्षभरापासून दुर्घटनांची मालिकाच सुरूच ( Chiplun Accident Video)

या महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. साधारणपणे या पुलाची लांबी १,८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी असून, हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला होता. मात्र, या पुलाचे काम सुरू झाल्यापासून गेल्या वर्षभरापासून दुर्घटनांची मालिकाच सुरू झाली आहे. वर्षभराच्या आतच पुन्हा याच ठिकाणी ही दुसरी दुर्घटना घडली आहे. यात गंभीर बाब म्हणजे कोणताही सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षा न घेता कामगारांकडून या पुलाचे काम सुरु होते.

‘लाडकी बहीण’ योजनेचा असाही फायदा! बँक अकाउंट चेक करताच पळून गेलेल्या पत्नीचा लागला असा शोध

या पुलासाठी एकूण ४६ खांब उभारण्यात आले आहेत, पावसाळ्यातही त्याचे काम सुरू आहे. पण १६ ऑक्टोबर २०२३ रोजी या पुलाचा बहादूरशेख नाका येथे काही भाग कोसळला होता. यावेळी तपास आणि चौकशीअंती पुलाच्या रचनेत काही बदल करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार तोडफोडीचे काम सुरू होते. यावेळी शुक्रवारी पुलाच्या एका खांबाची कापलेली बाजू क्रेनच्या साह्याने खाली उतरविण्याचे काम सुरू होते. मात्र, क्रेनचे खांबाला अडकवलेले हूक अचानक निसटले आणि खांब खाली कोसळला. यावेळी पुलाच्या पिलरवर उभे असलेले दोन कामगारही खाली कोसळले; तर तिसरा कामगार सळ्यांमध्ये अडकून राहिलाय. या दुर्घटनेत तीनही कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे या सगळ्या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three workers injured in accident while demolishing part of bridge in chiplun accident video viral sjr
Show comments