वन्यजीवांचं जग हे अद्भूत आहे. या दुनियेत प्रत्येक क्षणी जीवन-मरणाचा खेळ सुरू असतो, कधी कोणाची शिकार होईल आणि कधी कोण शिकारीतून वाचेल हे सांगता येत नाही. सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून नेटकरी थक्क होऊन जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक झेब्रा चक्क सहा सिंहाच्या तावडीत सापडला आहे. जीव मुठीत घेऊन झेब्रा पुढे पळतो आणि त्याच्यावर एका पोठा एक सिंह हल्ला करत आहेत, शेवटी जे घडतं ते कल्पनेपलीकडील आहे.

सहा सिंहांच्या तावडी सापडलेल्या झेब्राचा थरारक व्हिडीओने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. थरारक शिकारीच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे..दुर्मिळ फुटेज ट्विटरवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. सहा सिंहाच्या तावडीत सापडूनही झेब्रा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. आपले चातुर्य आणि दृढनिश्चयाच्या जोरोवर हा झेब्रा सहा सिंहांच्या तावडीतून कसा वाचतो हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल.

हेही वाचा –“हेल्मेटने तारले! डोक्यावरून कार जाऊनही थोडक्यात वाचला दुचाकीस्वार, थरारक अपघाताचा Video Viral

व्हिडीओच्या सुरुवातीला दिसते एक झेब्रा वेगात धावताना दिसत आहे, त्याच्या मागे दोन सिंह धावत आहेत. त्यापैकी एक सिंग झेब्राच्या अंगावर उडी मारून त्याला चावण्याचा प्रयत्न करतो पण झेब्रा त्याला धुडाकवून लावतो. पुढच्या क्षणी तिसरा सिंह झेब्राच्या अंगावर तुटून पडतो. वेगाच्या भरात झेब्रा त्यालाही धुडाकावतो आणि धावत राहतो. त्याच्या मागे धावणारे सिंह पुन्हा पुन्हा त्याच्यावर हल्ला करतात पण तरीही तो हार मानत नाही. झेब्रा धैर्याने त्यांचा सामना करतो. धावता धावतो तो एका सिंहाला जोरात लाथ मारून ढकलताना दिसतो. तो न थांबता धावत राहतो आणि अखेर सहा सिंहाच्या तावडीतून सुटतो.

हेही वाचा “मला तुमची मदत हवीये”; भटक्या कुत्र्यासाठी रतन टाटांची मुंबईकरांना आर्त हाक

व्हिडीओ एक्सवर @AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “झेब्रा सहा सिंहांच्या तावडीतून जिवंत सुटतो” व्हायरल व्हिडिओने ट्विटरवर प्रतिक्रियांचा पूर आला आहे, जिथे वापरकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

एका सदस्याने कमेंट केली, “वह आपला जीव वाचवण्यासाठी लढत आहे, सिंह फक्त दुपारच्या जेवणासाठी लढत आहे.” दुसऱ्याने “अद्भुत” असे लिहिले. तिसऱ्याने लिहिले, “व्हिडीओसाठी धन्यवाद. हे आश्चर्यकारक आहे.” अनेकांनी व्हिडीओ शेअर केल्याबद्दल आभार व्यक्त केले कारण झेब्राचे धाडस पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली.