अखेर देशभरातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही लोकांच्या घरात पाणी शिरल्याचे तर काही ठिकाणचे पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह या ठिकाणांहून असे व्हिडिओ समोर येत आहेत जे पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा येत आहे. एकीकडे हिमाचलमधील अनेक नद्यांना महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. अशातच आता हरिद्वारमधील असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो तुम्हाला पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. कारण व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ढग तयार होत असल्याचा दावा केला जात आहे.
हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. शिवाय उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटना सातत्याने घडत आहेत. या दिवसांत उत्तर भारतातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर मागील दोन-तीन दिवसांत उत्तराखंडच्या विविध भागांतून अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या सर्व धक्कादायक बातम्या पाहत आणि वाचत असतानाच आता हरिद्वारमधील ढगांच्या निर्मितीच्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
हेही पाहा- कुत्र्याचा चालायला नकार, शेवटी मालकानेच मानली हार, मजेशीर Video पाहिल्यानंतर तुम्हीही पोट धरुन हसाल
कारण हा व्हिडिओ इतका भयानक आहे की, तो पाहून अनेकजण घाबरले आहेत. या व्हिडिओमध्ये दोन ढग एकमेकांवर आदळत असल्याचे दिसत आहे. शिवाय या दोन ढगांमध्ये एक रेषदेखील दिसत आहे. हे दृश्य बर्फाळ पर्वतांवर हिमस्खलनापसारखे दिसत आहे. तिथे उपस्थित लोकांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये काही लोकांच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत, तर काही लोक लोक इकडे-तिकडे धावतानाही दिसत आहेत.
लोकांची धावपळ –
हरिद्वारच्या पांढऱ्या आकाशातील हे भितीदायक दृश्य पाहून तिथे उपस्थित लोकांमध्ये गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काळे ढग हळूहळू पुढे जात आहे तर याचवेळी लोकांची धावपळही सुरु आहे. तर हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी सध्या बर्फाळ आणि डोंगराळ भागात फिरायला जाऊ नये असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.