यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यामुळेच प्रेक्षकांना चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा होती. व्हीएफएक्स, मोठमोठ्या कलाकारांची वर्णी, तगडी स्टारकास्ट, भरपूर खर्च असं एवढं सगळं पॅकेज असताना चित्रपट १०० कोटींच्या घरात जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रदर्शनाच्या दिवशीच प्रेक्षकांची या सिनेमाने सपशेल निराशा केली आहे. अनेकांना हा सिनेमा आवडला नसून सोशल मिडियावर सिनेमाची खिल्ली उडवली जात आहे. अगदी पैसे फुकटे गेल्यापासून ते आमिरचा सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा असे अनेक ट्विटस सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. ट्विटवर #ThugsOfHindostan हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग होत असला तरी त्यावरील अनेक ट्विटस हे ट्रोल करणारचे आहेत. त्यामुळेच तुम्ही हा सिनेमा पाहण्याचा विचार करत असला तर हे ट्विटस एकदा पहाच असंच आम्ही तुम्हाला सांगू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिनेमा सुरु झाल्यानंतर पहिल्या २० मिनिटांमध्ये प्रेक्षकांची स्थिती

समजेल सिनेमाला जाऊन आलो

सिनेमाला किती रेटिंग देशील

मैं नही बचेगा इधर…

इंटर्व्हल पर्यंत ही परिस्थीती

एका शब्दात सांगायचं तर

घरी जाऊन झोपा सिनेमागृहात नाही

तीन तास छळ

ते दोघे एकत्र आले तरी…

सिनेमा बघून सिनेमागृहाबाहेर पडणारे प्रेक्षक

देवा आम्हाला फक्त सुखरुप घरी जाऊ दे

जेव्हा तुम्ही सिनेमाचे तिकीट बूक करता

पंधरा मिनिटांनतर

हे सगळे रिव्ह्यू वाचल्यानंतर आमिर खान</strong>

रिव्ह्यू काय देणार

तुम्ही क्वीट करु शकता

तुलाना करायचीच झाली तर

सेकेण्ड हाफ बद्दल काय सांगणार

प्रेक्षक सिनेमा पाहून बाहेर येताना

..आणि शेवटी ज्यांनी आधीच तिकीटे बूक केली आहेत आणि हे ट्विटस वाचत आहेत त्यांची स्थिती

हे सर्व ट्विटस वाचल्यावर चित्रपट व्यापार विश्लेषक आणि समीक्षक तरण आदर्शने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बद्दल केलेले ट्विट आठवते. आपल्या ट्विटमध्ये सिनेमाचे वर्णन करताना म्हणतो, ‘प्रत्येक चकाकणारी गोष्ट सोनं नसते.’ तरणने सिनेमाला अवघे दोन स्टार दिले आहेत. त्यामुळेच आता हा सिनेमा तिकीटबारीवर किती कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thugs of hindostan got trolled on twitter