Andheri station Viral video: शहरात लोकलने फुकटात प्रवास करणाऱ्या आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचा मोठा महसूल बुडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना चाप लावण्यासाठी जास्तीत जास्त दंड आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केलाय. विनातिकीट प्रवास केल्यानंतर दंड आकारूनही प्रवाशांची संख्या काही केल्या कमी होत नाही. विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेने अंधेरी रेल्वेस्थानकावर नुकतीच मोठी कारवाई केली. यावेळी अंधेरी रेल्वेस्थानकावर टीसींची फौजच पाहायला मिळाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरेच तुम्हीसुद्धा शॉक व्हाल.
सात लाख रुपये दंड वसूल
अंधेरी रेल्वेस्थानकावर एवढ्या मोठ्या संख्येने टीसी पहिल्यांदाच पाहायला मिळाले. अंधेरीच्या मेन ब्रिजवर हे टीसी प्रवाशांकडून तिकीट मागत होते. यावेळी एक-दोन नाही तर एकाच ब्रिजवर जवळजवळ ५० हून अधिक टीसी पाहायला मिळाले. यावेळी संपूर्ण दिवसभरात २,६९३ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. या विनातिकीट प्रवाशांकडून सात लाख १४ हजार ०५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत एकाच स्थानकात करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी मुंबईत रेल्वेची भन्नाट ट्रिक
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीसींची ही फौज एकाही प्रवाशाला तिकीट दाखवल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही. प्रवासीही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टीसींची संख्या बघून अवाक झाले होते. कुणी त्यांना बघून गुपचूप पळ काढत होते; तर कुणी बघूनच मागे फिरत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आता विनातिकीट प्रवास करताना १०० वेळा विचार कराल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> संतापजनक! पाकिस्तानात जेवणाला उशीर झाला म्हणून सासऱ्याची सुनेला बेदम मारहाण, VIDEO होतोय व्हायरल
मुंबईत रेल्वेने केलेल्या या धडक कारवाईचे व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. याबाबत अनेकांनी विनातिकीट प्रवाशांना चांगली अद्दल घडवली म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.