सर्वसामान्यांच्या अगदी जवळचा विषय म्हणजे मुंबई लोकल. अनेकांच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात ही रेल्वेने होते. खिशाला परवडणारी व सहज सोपी अशी वाहतूक म्हणजे रेल्वे. मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमध्ये नेहमीच तुम्हाला गर्दी दिसणार, रोज लाखोंच्या संख्येने प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे तिकिटाची किंमतही अगदी शुल्लक आणि परवडणारी आहे, तरीही काही फुकटे प्रवासी तिकीट काढत नाहीत. रेल्वेने प्रवास करताना कधी असे प्रसंग येतात, जेव्हा आपण हतबल होतो. म्हणजे रेल्वेचं तिकीट काढायला भली मोठी रांग असते आणि तेवढ्यातच ट्रेनचा भोंगा वाजतो, त्यामुळे तिकीट न घेताच तुम्ही ट्रेनमध्ये चढता. त्यानंतर ट्रेनमध्ये तिकिटाशिवाय चढल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
मागच्या काही दिवसांमध्ये रेल्वेनं या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाईंदर रेल्वे स्टेशनवर टीसींची फौजच पाहायला मिळाली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खरेच तुम्हीसुद्धा शॉक व्हाल.
भाईंदर रेल्वेस्थानकावर एवढ्या मोठ्या संख्येने टीसी पहिल्यांदाच पाहायला मिळाले. भाईंदरच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे टीसी प्रवाशांकडून तिकीट तपासत होते. यावेळी एक-दोन नाही, तर जवळजवळ ५० हून अधिक टीसी पाहायला मिळाले. यावेळी संपूर्ण दिवसभर प्रवाशांना पकडण्यात आले. या विनातिकीट प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला.
विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी मुंबईत रेल्वेची भन्नाट ट्रिक
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, टीसींची ही फौज एकाही प्रवाशाला तिकीट दाखवल्याशिवाय पुढे जाऊ देत नाही. प्रवासीही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टीसींची संख्या बघून अवाक झाले होते. कुणी त्यांना बघून गुपचूप पळ काढत होते; तर कुणी बघूनच मागे फिरत होते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आता विनातिकीट प्रवास करताना १०० वेळा विचार कराल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> लोकांच्या जीवाशी खेळ! बाजारातून कोबी विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल
मागच्या काही दिवसांमध्ये रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सोशल मीडियावरही हे व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ aamchi_mumbai या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटचा वर्षाव केला आहे.