Shocking video:मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. एसी लोकलमध्येही हल्ली असा फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बस प्रवास, रेल्वे प्रवासात वादविवाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तिकिटावरुन कंडक्टर, टीसीसी वाद झाल्याच्या घटना अनेकदा पाहायला, ऐकायला मिळतात. अनेकदा हा किरकोळ वाद थेट हाणामारीपर्यंतही जातो. सध्या मुंबईतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विनातिकीट प्रवाशाला एका महिला टिसीनं कसं पकडलंय हे पाहायला मिळतंय. त्यामुळे आता यापुढे विनातिकीट प्रवास करणे टिसीला हकल्यात घेणे मुंबईकरांना महागात पडणार आहे. मुंबईतील करीरोड स्टेशनवरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

शहरात लोकलने फुकटात प्रवास करणाऱ्या आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी नाही. रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांमुळे रेल्वेचा मोठा महसूल बुडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना चाप लावण्यासाठी जास्तीत जास्त दंड आकारण्याचा प्रस्ताव रेल्वेने तयार केलाय. विनातिकीट प्रवास केल्यानंतर दंड आकारूनही प्रवाशांची संख्या काही केल्या कमी होत नाही. विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या करीरोड रेल्वेस्थानकावर नुकतीच मोठी कारवाई केली. पळून जाणाऱ्या एका फुकट्या प्रवाशाला एका महिला टीसीने अक्षरश: रेल्वे स्टेशनच्या बाहेर जाऊन पकडलंय. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा शॉक व्हाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, करीरोड स्टेशनवरुन विनातिकीट असलेल्या एका प्रवाशाला टीसीनं पकडलं, मात्र यावेळी त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो पळू स्टेशनच्या बाहेर आला, त्याला वाटलं आता इथे टीसी येणार नाही. मात्र ही महिला टीसी अक्षरश: त्याला पकडण्यासाठी स्टेशनच्या बाहेर आली आणि त्या व्यक्तीला पकडलं. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, टीसीनं व्यक्तीला कॉलरला धरलं आहे, यावेळी तो व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र टीसीनं त्याला बरोबर पकडून ठेवलं आहे.

पाहा व्हिडीओ

मुंबईत रेल्वेने केलेल्या या धडक कारवाईचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत अनेकांनी विनातिकीट प्रवाशांना चांगली अद्दल घडवली म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.