Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर, तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहयला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवितात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक वाघ शिकार करताना दिसत आहे.
स्वतःची भूक भागविण्यासाठी लोक दिवस-रात्र कष्ट करतात. माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करतात. अनेकदा जंगालातील वाघ, सिंह देखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात वाघ हरणाची शिकार करताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @ranthambhorepark या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका तळ्यामध्ये एक हरण पाणी पीत असताना अचानक मागून एक वाघ येतो आणि त्याची शिकार करतो. यावेळी वाघाने चपळाईने केलेला हल्ला पाहून युजर्सही अवाक झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानातील रणथंबोर नॅशनल पार्कमधील असून, या व्हिडीओला २९ हजारहून अधिक व्ह्युज आणि एक हजारहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्स अनेक कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिलेय, “खूप वाईट… एका सुंदर हरणाची हत्या झाली.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “वाघ खूप हुशार आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “हा निसर्ग आहे. इथे प्रत्येकाचं आयुष्य दुसऱ्यावर अवलंबून असतं.” तर, आणखी एकाने लिहिलेय, “वाघ खूप भुकेला आहे.” दरम्यान, याआधीदेखील सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी अशाच एका वाघाने कुत्र्यावर हल्ला केला होता.