अमेरिकन निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. कोण होणार या महासत्तेचा अधिपती याबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले जात आहे. गंमतीचा भाग म्हणजे बाबा, बुवा तर सोडाच पण आता प्राणी देखील या निवडणुकांची भविष्यवाणी करु लागले आहे. साधरण वर्ल्ड कप स्पर्धा, निवडणुका आल्या की प्राण्यांकडून भविष्यवाणी वर्तवल्याच्या बातम्या वारंवार वाचण्यात येतात. अशातच सैबिरियामधल्या एका प्राणी संग्रहालयातल्या वाघाने आणि ध्रुविय अस्वलाने कोण जिंकून येईल याचे भाकित वर्तवले आहे.

या प्राणी संग्रहालयातली वाघिण युनोना हिने डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्ष हिलेरी क्लिंटन राष्ट्राध्यक्ष होतील असे भाकित वर्तवले आहेत तर या संग्रहालयातील ध्रुवीय अस्वल फेलिक्स यांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला आहे. चेन्नईमधल्या चाणक्य नावाच्या माशाने ही ट्रम्पच्या बाजूने कौल दिला तेव्हा प्राण्यांनी वर्तवलेली ही भविष्यवाणी किती खरी आणि किती खोटी ठरले हे आता बघण्यासारखे ठरले. विशेष म्हणजे चेन्नईतल्या ज्या माशाने ट्रम्प यांच्या विजयाचे भविष्य वर्तवले होते त्यांनी याआधीही जितकी भाकिते वर्तवली ती खरी ठरली आहेत. प्राण्यांकडून अशा प्रकारे कौल जाणून घेण्याचा प्रकार काही नवीन नाही याआधीही फिफा, वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान असे भविष्य वर्तवणारे प्राणी समोर आले होते.