Tiger Attack Video: वाघ हा जंगलाचा राजा आहे. हा सुंदर प्राणी भारतातील विविध जंगलांमध्ये, अभयारण्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे वाघांच्या संवर्धनाबाबत आपल्या देशातील लोक अधिक जागरुक असतात. जंगलांचे प्रमाण दिवसेनदिवस कमी होत असल्याने वनप्राण्यांची संख्या कमी होत आहे. हरीण, सांबर असे प्राणी वाघाची शिकार असतात. हे प्राणी नाहीसे झाल्याने भक्ष्य मिळवण्यासाठी वाघांसारखे जंगली प्राणी नाईलाजाने मानवी वस्तीमध्ये प्रवेश करतात.

मानवी वस्त्यांमध्ये फिरताना माणूस समोर आल्यावर वाघ स्वत:चा बचाव करण्याच्या हेतूने हल्ला करतो. तर काही वेळेस वाघाची खोड काढल्यामुळे वाघ माणसांना इजा करतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात हात घालून वाघाला एका प्रकारे त्रास देणाऱ्या तरुणावर वाघाने हल्ला केल्याचे पाहायला मिळते. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल हे नक्की.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
tiger attack on cow
VIDEO: शिकार करो या शिकार बनो! ताडोबामध्ये वाघानं पर्यटकांसमोरच केला गायीवर हल्ला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Vineeta Singh says Ek crore to aap ek ghante mein kama lete ho (1)
Video: “तासाला १ कोटी कमावता, मग इथे…” ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल अन्…
Tipeshwar Wildlife Sanctuary yavatmal
टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?

या व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण वाघाच्या पिंजऱ्याबाहेरुन वाघाला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसते. जवळ येणाऱ्या त्या तरुणाकडे दुर्लक्ष करत वाघ काहीसा मागे जातो. पण वाघाला स्पर्श करण्याच्या नादात तरुण आपला हात पिंजऱ्याच्या आत घालतो. आपण ज्याप्रमाणे मांजरींना कुरवाळतो, त्याच प्रमाणे तो तरुण वाघाला कुरवाळण्याचा प्रयत्न करतो. वाघाच्या मानेला स्पर्श करण्यामध्येही तो यशस्वी होतो. काही सेकंद वाघ त्या तरुणाला स्वत:ला स्पर्श करु देतो, पण पुढे लगेच तरुणाचा हात भल्यामोठ्या दातांनी पकडतो. त्या तरुणाच्या बाजूला असलेली व्यक्ती ही घटना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत असते. तरुणाचा हात वाघाने पकडल्यावर ती व्यक्ती रेकॉर्डिंग थांबवून त्या तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावते.

आणखी वाचा – Fire Stunt Video: आगीशी खेळ करणं तरुणाला भोवलं; बाजारात लोकांसमोर खेळ करण्याच्या नादात कपड्याने पेट घेतला अन्..

earth.reel या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या चित्तथरारक व्हिडीओला प्रचंड प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक हा व्हायरल व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

Story img Loader