Tiger Attack On Farmer Viral Video : जंगलात फिरणारा वाघ, बिबट्या, गवासारख्या प्राण्यांचे मानवी वस्तीत मुक्त संचार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. पण वाघाने एका शेतकऱ्यावर केलेल्या हल्ल्याच्या व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण एका गावात शिरलेल्या वाघाला घेरण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला होता. मात्र, वाघाने त्याचा रंग दाखवून शेतात उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर सर्वांसमोर जीवघेणा हल्ला केला. वाघाच्या हल्ल्याचा संपूर्ण थरार झाडावर बसलेल्या एका व्यक्तीने कॅमेरात कैद केला. हा थरारक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाघाने शेतकऱ्यावर केलेला जीवघेणा हल्ला गावातील एका व्यक्तीने झाडावर बसून शूट केला. हा संपूर्ण थरार कॅमेरा कैद झाल्यानंतर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. गावात असलेला वाघ मोठ्या झेपा टाकत थेट शेतात घुसल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. वाघाला घेरण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांना शेतकऱ्यावर हल्ला केल्याचं पाहून धक्काच बसला. वाघाचा जीवघेणा हल्ला पाहून गावकऱ्यांनी आरडाओरडा केल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. वाघ शेतात घुसल्यानंतर काही गावकऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता धूम ठोकली. पण एक जण वाघाच्या तावडीत सापडला आणि होत्याचं नव्हतं झालं.

नक्की वाचा – टॅलेंटला तोड नाही! पठ्ठ्याने १० सेकंदातच साडी नेसली, साडी खरेदी करायच्या आधी हा Viral Video पाहाच

इथे पाहा व्हिडीओ

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या वाघाच्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारे आले असतील. कारण वाघ ज्या पद्धतीने सर्व गावकऱ्यांसमोर थेट शेतात घुसून शेतकऱ्यावर हल्ला करतो, ही दृष्य थरारक आहे. बिबट्याही मानवी वस्तीत घुसून माणसांवर हल्ला करतो, पण अनेकदा बिबट्या माणसांना घाबरून पळ काढतो. मात्र, या वाघाने साऱ्या गावकऱ्यांच्या नाकी नऊ आणलं. गावकऱ्यांनी सर्व बाजून वेढा घातला असतानाही वाघ शेतात उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करतो. वाघाने हल्ला केल्यानंतर गावकऱ्यांमध्ये भतीचं वातावरण निर्माण झाल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.