जसं सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं त्याचप्रमाणे हत्तीला देखील जंगलाचा गजराज म्हणतात. सिंह, वाघ यांसारखे भक्षक प्राणी देखील हत्तीची शिकार करायला घाबरतात. सध्या सोशल मीडियावर वाघाचा आणि हत्तीचा एक तुफान व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून लोक हैराण झाली आहेत. गवतात लपून बसलेला वाघ हत्तीच्या दिशेने धावताच हत्तीने अवघ्या ३० सेकंदात पालटलेला डाव खरंच हैराण करणारा आहे. तुम्हीही हत्ती आणि वाघाचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहाच…

वाघाने हत्तीवर हल्ला केला

अवघ्या ४७ सेकंदांच्या या क्लिपमध्ये वाघ गवतामध्ये लपून हत्तीला पाहताना दिसतो. मग तो गुपचूप उठतो आणि हत्तीजवळ जाऊन थांबतो. हत्तीही सावध होतो, पण पुढे सरकताच वाघ त्याच्यावर हल्ला करतो. यानंतर हत्ती मागे वळतो आणि वाघावर हल्ला करतो. हत्ती मागे लागताच हत्ती जीव वाचवून पळताना दिसतो.

( हे ही वाचा: Viral Video: लग्नमंडपात नवरीचा धिंगाणा; होणाऱ्या नवऱ्यासमोरच एक्स बॉयफ़्रेंडसाठी असं काही केलं की…)

वाघ घाबरवू शकतो पण…

( हे ही वाचा: Viral Video: पैसे घेऊन पिझ्झा घ्यायला आलेल्या चिंपाझीला पाहून डिलिव्हरी बॉय पडला बुचकळ्यात! पुढे असं काही घडलं की…)

जंगलातील हा व्हिडिओ ट्विटर युजर @santoshsaagr ने IFS अधिकारी सुशांत नंदा यांना टॅग करत शेअर केला आणि लिहिले आहे, वाघ घाबरू शकतो पण बलाढ्य हत्तीला मारू शकत नाही. आतापर्यंत या क्लिपला दोन हजारांहून अधिक व्ह्यूज आणि सुमारे दीडशे लाईक्स मिळाले आहेत. तसंच अनेकजण यावर वेगवेगळ्या कंमेंट करताना देखील दिसत आहेत.

Story img Loader