वाघ हा जंगलातील भयानक प्राण्यांपैकी एक आहे. वाघाला भयंकर शिकारी म्हणून ओळखलं जातं. तो आपल्या शिकारीला क्वचितच सोडत असेल. त्यामुळे जंगलातील इतर प्राणीही त्याला घाबरतात. या मांसाहारी प्राण्यांना जंगलातील प्राण्यांना मारून पोट भरण्याशिवाय जगण्याचे दुसरे साधन नाही. अशात परिस्थितीत ते पोट भरण्यासाठी कशाचीही शिकार करताना दिसून येतात. सध्या वाघाच्या शिकारीचा एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बैलांचा कळप सुरुवातीला दिसत आहे. दरम्यान त्या ठिकाणी वाघ येतो आणि बैलांच्या कळपावर जोरदार हल्ला करतो. यावेळी बाकी प्राणी पळून जातात, बाकी प्राण्यांना पाळून जाण्यात यश येत तर एक बैल मात्र वाघाच्या तावडीत सापडतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, एकदा का वाघाच्या तावडीत कुणी सापडलं की त्याची सुटका होणं जवळजवळ अशक्यच. अशाच प्रकारे आपल्या जबरदस्त पकडीमध्ये तो बैलाला पकडतो आणि त्याला ठार करतो. बैलाला पळण्याची एकही संधी मिळत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – फिरत्या पंख्यावर अडकलेला ‘साप’ थेट तरुणाच्या अंगावर, थरकाप उडवणारा Video होतोय तुफान व्हायरल

 सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger claws at a bull killed tiger attack on tiger video viral on social media srk