Tiger falling in well : प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. त्याचं झालं असं की वाघ आणि रानडुक्कर एकाच विहिरीत पडले, आता पुढे काय झालं तुम्हीच पाहा.

जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. मात्र पैसा, सौंदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते म्हणूनच आयुष्यात कधीच ताकदीचा गर्व करू नका, एक दिवस असाही येतो. सिंहाची अवस्था पाहून म्हणाल आयुष्यात अंतिम सत्य हेच आहे.

मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात हा असामान्य प्रकार घडला असून वाघ रानडुक्कराची शिकार करताना दोघेही शेतातील एका विहिरीत पडले. त्यानंतर वाघ हा शिकार सोडून ‘शिकारी आणि शिकार’ दोघेही एकाचं ठिकाणी आपला जीव वाचवण्यासाठी वाट पाहताना दिसले. या वाघाला आणि रानडुक्कराला पाहण्यासाठी विहिरीभोवती गावकऱ्यांनी गर्दी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. शिकार करण्यासाठी वाघ रानडुक्कराचा पाठलाग करत होता. परंतु, चुकून दोघंही खोल विहिरीत पडले. दरम्यान, गावकऱ्यांनी वन्यजीव बचाव पथकांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर दोन्ही प्राण्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

पाहा व्हिडीओ

@PenchMP नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला २ हजारांच्या वर लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.  एकानं म्हंटलंय, वेळ कधीही बदलते, तर आणि एकानं “कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व करू नये कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पैसा, सौंदर्य, ताकद या सगळ्यांला मर्यादा ही असतेच”

Story img Loader