लहान मुलांना आईशिवाय एक मिनिट सुद्धा राहता येत नाही. त्यांना आजुबाजुला नेहमी आई लागतेच. कारण आई जवळ असेल तर आपल्याला कशालाही घाबरायची गरज नाही, आपल्यावर कोणतेही संकट ओढवणार नाही अशी शाश्वती त्यांना वाटते. प्राण्यांचे देखील असेच आहे. सतत आईसोबत असणारे, फिरणारे अनेक प्राण्यांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे एक विशेष कारण आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक वाघीण आणि तिची दोन पिल्लं दिसत आहेत. वाघीण पुढे चालताना दिसत आहे तर तिची पिल्ल रमतगमत मागुन येताना दिसत आहेत. पण आईच्या मागुन जाताना ही पिल्ल काळजीपुर्वक आईच्या पावलावर पाऊल ठेवत नीट पुढे जात आहेत. या पिल्लांच्या यां गोंडस व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसु येईल.

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला व्हिडीओ :

सुशांत नंदा यांनी या व्हिडीओला ‘आईच्या पावलांवर पाऊल ठेऊन चाललात तर योग्य ध्येयापर्यंत नक्की पोहचाल’ असे कॅप्शन दिले आहे. नेटकऱ्यांना या पिल्लांची निरागसता भावली असून, हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

Story img Loader