समाजमाध्यमांवर अनेकदा जंगली प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात वाघाच्या शिकारीचे, हल्ल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. वाघाचा व्हिडीओ आणि फोटो बघणं ठीक; पण आपल्यासमोर अचानक वाघ आला तर? अशी परिस्थिती कोणावर ओढवली, तर त्या व्यक्तीची स्थिती तिथेच घाबरगुंडीने अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच. सध्या समाजमाध्यमांवर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात अचानक घरातील शौचालयात वाघ शिरण्याचा प्रयत्न करतो. मग तेथील व्यक्तीनं वाघाला पाहून नेमकं काय केलं आणि पुढे काय घडलं, ते व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हीच पाहा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाघ खिडकीत आला अन्…

सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक वाघ अचानक एका शौचालयाच्या खिडकीतून डोकावतो आणि आत यायचा प्रयत्न करीत असतो. वाघ आत येण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून शौचालयात असलेली व्यक्ती त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करते आणि सोशल मीडियावर शेअर करते.

हेही वाचा… आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी

हा व्हिडीओ @motivation_line_daily या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘इस स्थिती में आपका पहला कदम क्या होगा’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली ते अद्याप कळू शकलेले नाही.

हेही वाचा… कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप

वाघाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि त्यावर तर्क-वितर्क लढवून, प्रत्येकाने आपापल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “त्याच्या डोळ्यांत पाणी टाका.” दुसऱ्यानं, “तो अंघोळ करायला आला आहे वाटतं. खूप दिवस त्यानं अंघोळ केली नसेल” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “पुढे पाऊल तर वाघ उचलेल. आपल्याला फक्त सावधान राहायचं आहे.” “ज्याने व्हिडीओ बनवला आहे, तो जिवंत आहे का” असा प्रश्नदेखील एकाने विचारला. “मी तर बेशुद्धच झाले असते”, “तोंडावर चप्पल मारून पळून जायचं” अशा विविध प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.