सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ दिसतात. कोणता व्हिडीओ कधी व्हायरल होईल याचा अंदाज लावता येणार नाही. सोशल मीडियावर प्राण्यांशी पक्ष्याशी संबंधित अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात; तर काही व्हिडीओ मजेदार असतात. यातील काही भयान हल्ल्याचे असतात. तर काही शिकारीचे व्हिडिओ असतात. त्यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोशल मीडियावर अनेकदा समुद्रातील काही रहस्यमय जीवांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे फोटो, व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासही बसणार नाही. माशांच्याही अनेक प्रजाती आहेत. यापैकी काही अत्यंत धोकादायक आहेत. शिकार पाहताच हे मासे त्यांना पकडतात. या माशांपैकी एक म्हणजे वाघ मासा. ज्याची गती बिबट्यासारखी मानली जाते. या माशाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये मासे आपल्या भक्ष्याला कसे पकडतात ते पाहता येते. हवेत उडणाऱ्या पक्ष्याला माशांनी काही सेकंदात पकडले. माशांचा वेग पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत. आतापर्यंत वापरकर्त्यांनी एवढ्या वेगाने गरुडाची शिकार करताना पाहिले होते.
(हे ही वाचा:भारतातील नव्हे तर आता कंगाल पाकिस्तानातील तरुणांचा भन्नाट जुगाड, Video पाहून म्हणाल, ”असं फक्त पाकिस्तानात होऊ शकतं”)
असा पक्षी पकडला
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पक्षी नदीवरून उडताना दिसत आहे. पण, पुढच्याच क्षणी आपला मृत्यू होईल, हे त्या बिचाऱ्या पक्ष्याला माहीत नव्हते. ज्याप्रमाणे जंगलात वाघ अगदी हुशारीने आपली शिकार पकडतो, त्याचप्रमाणे या माशाने पाण्यात आपली हुशारी दाखविली आहे. पक्षी हे विमानाप्रमाणे आकाशात उंच भरारी घेत उडू शकतात. पण या पक्षाला तशी संधीही मिळाली नाही.
हा पक्षी शिकारी माशाच्या रडारवर येताच मासा लगेच पाण्यातून बाहेर येतो आणि त्याच्यावर वादळाप्रमाणे हल्ला करतो. काही सेकंदात मासा तो पक्षी पकडतो. पक्षी तोंडात पकडल्यानंतर तो पुन्हा पाण्यात जातो. त्याची स्पीड पाहून तुम्हीही चकित व्हाल. अशी शिकार कदाचित तुम्ही आजवर कधीच पाहिली नसेल. माशाने पक्ष्याची शिकार केली, असे या व्हिडीओद्वारे लक्षात येते. या शिकारी माशाला वाघ मासा असेही म्हणतात.
येथे पाहा व्हिडिओ
वाघ मासा, भयानक माशांपैकी एक
व्हिडिओमध्ये दिसणारा मासा आफ्रिकन टायगर फिश आहे, जो एक भयंकर शिकारी मासा आहे. हा मासा वेगवान आणि वेगवान शिकारीसाठी ओळखला जातो. पाण्याखाली, तो बिबट्यापेक्षा जास्त वेगाने आपली शिकार पकडतो. हे मासे बऱ्याचदा पाण्यातून उडी मारतात आणि उडणाऱ्या पक्ष्यांना आपले शिकार बनवतात. त्याचा वेग आणि चपळता पाहून त्याला टायगर फिश असे नाव देण्यात आले आहे. हे मासे मुख्यतः नामिबियातील चोबे आणि झांबेझी नद्यांमध्ये आढळतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @namibia_africa नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ लिहिपर्यंत ५ लाख ३० हजार लोकांनी तो लाईक केला आहे आणि करोडो लोकांनी तो पाहिला आहे.