Tiger Vs Monkey Viral Video: पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात भटकणारा वाघ कधी कुणाची शिकार करेल, याचा अंदाज लावता येणार नाही. भुकेनं व्याकुळ झालेला वाघ समोर दिसलेल्या प्राण्यावर झडप घेतो आणि त्याची शिकार करतो. पण कधी कधी शिकारीसाठी निघालेल्या वाघाच्याही नाकी नऊ येतात, हे एका व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. एका वाघाने हरण, कोल्हा, झेब्रा नाही तर एका माकडाशीच पंगा घेतला. झाडावर चढण्याच पटाईत असणारा माकडाची शिकार करण्याचा वाघाचा डाव फसला अन् वाघ जमिनीवर तोंडावरच आपटला. जिम कॉर्बेट या उद्यानातील हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाघाला धडा शिकवण्यासाठी माकडानं लढवलेली शक्कल पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
…अन् माकडाच्या सापळ्यात वाघ अडकला
वाघाच्या आणि माकडाच्या लढाईचा हा व्हिडीओ ranthamboresome नावाच्या इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला शेकडो नेटकऱ्यांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करुन मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कारण या व्हिडीओत माकडाने वाघाला चांगलीच अद्दल घडवली आहे. वाघ एका झाडावर चढतो आणि माकडाची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण माकडही जराही न डगमगता वाघाला खाली पाडण्यासाठी सापळा रचतो. माकड झाडावर उड्या मारून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो. पण वाघाला झाडावर उड्या मारण काही जमत नाही. वाघाचा अतिवजनामुळं झाडाच्या फांद्या वाकतात आणि वाघ थेट जमिनीवर पडतो. माकडाने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्याचा खेळ करत वाघाला खाली पडण्यास मजबूर करतो. ही सर्व दृष्य कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
इथे पाहा व्हिडीओ
माळरानात चरायला गेलेल्या हरणांची वाऱ्याच्या वेगानं धावणारा वाघ काही सेकंदातच शिकार करतो. तसंच बिबट्यानेही चक्क पाण्यात जाऊन मगरींची शिकार केल्याचे व्हिडीओ समोर आलेले आपण पाहिले असतील. पण चक्क झाडावर चढून माकडाची शिकार करण्याचं धाडस या वाघाच्या चांगलच अंगलट आल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. कारण माकड नेहमीप्रमाणे झाडावर लपाछुपीचा खेळ खेळतो आणि वाघाला चिडवण्याचा प्रयत्न करतो. माकडाला पकडणं शक्य नसल्याचं वाघाच्या लक्षात आलं असावं, त्यामुळे वाघानेही झाडावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. पण वाघाला माकडासारख्या उड्या मारता येत नसल्याने तो जमिनीवर तोंडावरच आपटतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देत वाघाची एकप्रकारे खिल्ली उडवण्याचाच प्रयत्न केला आहे.