VIDEO VIRAL: प्राण्यांचे आणि त्यात मुख्यतः वाघाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. वाघ हा अतिशयक रुबाबदार आणि डॅशिंग प्राणी आहे. सद्य सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे. आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. वाघ हा प्राणी रुबाबदार तर आहेच. शिकार करताना त्याचा ऍटिट्यूड आणि इतर वेळी वावरताना त्याचा तोरा सगळंच जाम भारी असतो.सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होतं असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे. तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाहीत इतक्या उंचीवर हा वाघ झेप घेतो. आधी हा व्हिडीओ पाहताना, आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण संपूर्ण व्हिडीओ पाहाल तर वाह्ह क्या बात है असं म्हटल्याशिवाय राहणार नाही.
सुंदरबनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वाघ नदी ओलांडण्यासाठी मोठी उडी मारतो. वाघाला सुमारे २० फूट लांब उडी मारताना पाहून तुम्हीही म्हणाल की, हे दृश्य चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही. हा व्हिडिओ वेगाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Ananth_IRAS नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून ३८.६ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले – हे एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही, तर दुसऱ्याने लिहिले – खूपच अप्रतिम…
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “अरे तुम्ही २ लाख रुपयांची बाईक खरेदी करू शकता, पण…” धावत्या गाडीवर द्राक्षे चोरणाऱ्या तरुणांवर संतापले लोक
सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात जंगली प्राण्यांचा व्हिडीओ म्हटलं की, बऱ्याच लोकांना ते पाहायला फार आवडतं. जेव्हा सोशल मीडियाचा काळ नव्हता तेव्हा आपल्याला टीव्हीवरती किंवा डिस्कवरी वरती जंगली प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळायचे. परंतु आता सोशल मीडियावर आपल्या सगळ्या प्रकारचे कंटेन्ट पाहायला मिळतात. ज्यामध्ये जंगली प्राण्याचे व्हिडीओ देखील असतात.