वाघाला पिंज-यात डांबले तरी तो शिकार करायची सोडत नाही हे पुन्हा एखादा वाघाने सिद्ध करून दाखवले आहे. चीनच्या यंगोर संग्रहालयात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आपली पत्नी आणि छोट्या मुलासोबत संग्रहालय पाहायला आलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला अन् त्याचा जीव घेतला. हे सारे जण हतबल होऊन पाहण्यावाचून काहीच करु शकले नाही.

चीनच्या यंगोर संग्रहालयात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. आपली पत्नी आणि लहान मुलासोबत संग्रहालय पाहायला आलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला केला. त्याच्या मानेला पकडून फरफटत दूरपर्यंत नेले. दुर्देवाने मात्र त्याचे कुटुंब आणि इतर कर्मचारी काहीच करु शकले नाही. वाघाच्या तावडीतून त्याला सोडवण्यासाठी कर्मचा-यांना अपयश आले. वाघाच्या जबड्यातून सुटका करून घेण्यासाठी या व्यक्तीने खूप धडपड केली पण त्याचे प्रयत्न मात्र अपयशी ठरले. संग्रहालयातल्या कर्मचा-यांनी वाघाच्या तावडीतून त्याची सूटका करण्याचे प्रयत्न केले, त्याचे लक्षही विचलीत केले पण दुर्दैवाने त्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. शेवटी पाण्याचा मारा करत वाघाच्या जबड्यातून कर्मचा-याने या माणसाला सोडवले पण तोपर्यंत उशीर झाला होता.

याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यामुळे संग्रहालयात वावरताना काळजी घेण्याचे आवाहान करण्यात आले आहे. सहसा संग्रहालयातील प्राणी आक्रमक होत नाही परंतु जर एखादा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते मात्र आक्रमक होतात. त्यामुळे वाघ किंवा सिंहाच्या कचाट्यात सापडल्यास घाबरुन न जाण्याचा सल्ला अॅनिमल सायकॉलॉजिस्ट देतात. आपली शिकार दुबळी असल्याचे समजताच हे प्राणी हल्ला करतात आणि उताणे पाडतात त्यामुळे वाघ किंवा सिंहाने हल्ला केलाच तर त्यांच्याकडे पाठ न दाखवण्याचा सल्ला देतात. कारण हे प्राणी हल्ला करताना मागून हल्ला करून सावजाच्या मानेत आपले तीक्ष्ण दात खुपसतात म्हणूनच जीव वाचवण्यासाठी या गोष्टी करण्याचा सल्ला डिस्कव्हीरीच्या एका माहितीपटात दिला आहे. गेल्याच वर्षी सिनसिनाटी प्राणी संग्रहालयात असाच प्रकार घडला होता. यावेळी एक लहान मुल रांगत गोरीलाच्या पिंज-यात शिरले होते. त्याच्या जीवाला धोका होता पण अशा वेळी या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी कर्मचा-यांनी या गोरीलाला मारून टाकले होते.

Story img Loader