रशिया युक्रेन यांच्यातील युद्धाला आज ३१ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र युद्ध काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही. रशिया एक एक करत युक्रेनमधील शहरांवर ताबा मिळवत आहे. तर रशियाला रोखण्यात अमेरिकेसह नाटो देशांना अपयश आलं आहे. असं असताना अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयातील पुतिन वाघाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र पदरी अपयश आले. वाघाचं नाव पुतिन असल्याने अनेकांचा संभ्रम झाला आहे. मात्र पुतिन हे नाव का ठेवलं होतं? याबाबत कोणतीही माहिती नाही.

पुतिन वाघ १२ वर्षांचा होता. २०१५ पासून मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात राहत आहे. या वाघाचा जन्म २००९ मध्ये चेक प्रजासत्ताकमध्ये झाला होते. त्यानंतर त्यांचे नाव पुतिन ठेवण्यात आले. पुतिनने डेन्मार्कमधील प्राणीसंग्रहालयात ६ वर्षे घालवली. त्यानंतर त्याला मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले होते.

मिनेसोटा प्राणीसंग्रहालयाचे संचालक जॉन फ्रॉले यांनी सांगितले की, मिनेसोटा प्राणीसंग्रहालयातील सर्वांसाठी दु:खाचा दिवस आहे. त्याच्या मृत्यूने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. येथे कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रचंड वेदना झाल्या आहेत. प्राणिसंग्रहालयाने जागतिक स्तरावर व्याघ्र संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. व्याघ्र संवर्धन मोहिमेसाठी आम्ही लाखो डॉलर्स उभे केले आहेत. मिनेसोटा प्राणीसंग्रहालयात ४० वर्षांहून अधिक काळ व्याघ्र संवर्धनाचे काम सुरू आहे.”

Story img Loader