प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ प्राण्यांच्या गोंडस हावभावांवर हसू आणणारे असतात तर काही त्यांचे रौद्र रूप दाखवून थक्क करणारे असतात. असाच एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघ आणि नीलगाय समोरासमोर आलेले दिसत आहेत.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ वाईल्डलाईफ फोटोग्राफर राजेश सानप यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिथे काय घडलं हे सांगितलं आहे. वाघाने लांबून जवळपास ८० मीटरच्या अंतरावर असताना नीलगाईला पाहिले. तिथून गवताच्या मागे लपणे खूप सोपे होते, पण तरीही वाघाने नीलगाईच्या समोर जायचे ठरवले. असे राजेश सानप यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे, वाघ आणि नीलगाय जणू लपंडावाचा खेळ खेळत असल्याचे हा व्हिडिओ बघून वाटत आहे. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा : नारळातून खोबरं काढण्याची भन्नाट कल्पना; IAS Officer सुप्रिया साहू यांनी शेअर केलेला Video एकदा पाहाच
व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ थक्क करणारा आहे. कदाचित वाघाला अशा प्रसंगाचा अनुभव नसेल अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर काहींनी उत्तमरित्या या क्षण कॅप्चर केल्याबद्दल राजेश सानप यांचे कौतुक केले आहे.