वन्य प्राणी जीवनाविषयी लोकांना कायमच आकर्षन असतं. प्राणी, त्याचं जगणं, त्यांचं दिसणं याविषयी प्रत्येकाला कुतुहल असतं. यासोबत प्राण्यांविषयी भीतीदेखील मनात असते. प्राण्यांना पाहण्यासाठी लोक खास जंगल सफारीसाठीही जातात. प्राण्यांचे अनेक हल्ल्याचे, शिकारीचे, भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात जर पाहीलं तर वाघ हा अत्यंत आक्रमक प्राणी म्हणून ओळखला जातो. एका हल्ल्यात तो समोरच्या प्राण्याची चिरफाड करू शकतो. त्यामुळे वाघापासून चार हात लांब राहाणच बरं असं आपण म्हणतो, परंतु जर का तुमची याच वाघासोबत मैत्री झाली तर तुम्ही जणू जंगलाचे राजाच होता.
कारण वेळप्रसंगी वाघ तुमच्यासाठी हत्ती आणि सिंहाशी देखील पंगा घेऊ शकतो. विश्वास बसत नाहिये? तर मग हा व्हिडीओ पाहा, एक व्यक्ती पाठीमागे बिबट्या आणि समोर सिंह अशा स्थितीत अडकला होता. परंतु वाघानं मध्ये पडून त्याचे प्राण वाचवले. व्हिडीओ पाहून तुम्ही देखील दंगच व्हाल.
वाघानं वाचवला तरुणाचा जीव
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सिंह आणि वाघांसोबत मस्ती करताना दिसत आहे. ती व्यक्ती फक्त त्यांच्या जवळच बसलेली नाही तर त्यांच्यासोबत खेळतानाही दिसत आहे. इतक्यात अचानक वाघ बिबट्या आणि माणसाच्या मध्ये येतो आणि बिबट्याला माणसावर झेप घेण्यापासून थांबवतो. प्रथमदर्शनी बिबट्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी धावत असल्याचं दिसतं, मात्र त्यानंतर हल्ला करण्याऐवजी तो तिथेच खेळू लागतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – आनंद महिद्रांनी ट्विटरवर Video शेअर करत दिला महत्त्वाचा मेसेज; म्हणाले, ”संकट की संधी…’
हा व्हिडीओ जुना असला तरी आता तो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ११ मिलियन व्ह्यूज गेले आहेत.