राजस्थानच्या रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये काही पर्यटक जंगल सफारीचा आनंद घेत होते. हातात कॅमेरा पकडून व्हिडीओ काढत तेवढ्यात असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. थरारक घटनेच्या साक्षीदार असलेल्या पर्यटकांना धक्काच बसला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका वाघाने अचानक झुडपातून बाहेर येत एका गायीवर हल्ला केला आहे. ही घटना पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केली होती, ज्याचा व्हिडिओ रणथंबोर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता.
वास्तविक, सफारी जीप एका ठिकाणी थांबली आणि पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात एक आसपासच्या निसर्गाचे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करत आहे. पर्यटकांना पुढच्या क्षणी काय होईल याची अजिबात कल्पना नव्हती. उद्यानातील वाटेवरून एक गाय चालताना दिसली, तेवढ्याच अचानक झुडपात लपून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. गायीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पुढे काय घडले हे व्हिडीओमध्ये समजत नाही.
दरम्यान, हे सर्व प्रकार सफारी जीपच्या अगदी जवळ ही घटना घडल्याने पर्यटकांना धक्का बसला आहे. रणथंबोर नॅशनल पार्कमधील व्हिडिओ अनेकदा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले जातात आणि ते वन्यजीव प्रेमींसाठी हे व्हिडीओ प्रचंड आवडतात. याआधी, उद्यानातील पाण्याच्या खड्ड्यात वाघ आपल्या शिकारला ओढत असल्याचा व्हिडिओही इंटरनेटवर समोर आला होता.
आग्नेय राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात वसलेले, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे एकेकाळी जयपूरच्या महाराजांचे शिकारीचे ठिकाण होते. वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.