Tiger Viral Video : जंगलातील एका भयंकर शिकाऱ्याचा हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जो लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत. या धक्कादायक व्हिडीओमध्ये डॉक्टर एका वाघावर उपचार करताना दिसत आहे. वाघाच्या दातांमध्ये शिकार केलेल्या प्राण्याच्या हाडाचा एक मोठा तुकडा अडकल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे, जो काढण्यासाठी पशुवैद्याची धडपड सुरू आहे. वाघाच्या दातात अडकलेला हाडाचा तुकडा काढण्यासाठी चक्क हातोडीचा वापर करण्यात आला आहे. ज्या प्रकारे पशुवैद्य तो तुकडा हातोडीने काढतायत, ते पाहताना खरंच तुम्हालाही भीती वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण- चक्क वाघाच्या तोंडात हात घालून आणि हातोडीनं ठोकून तो तुकडा काढणं म्हणजे एक प्रकारे धडकी भरवणार असं त्या डॉक्टरचं काम आहे, असं म्हणावं लागेल.

वाघाच्या दातात अडकला हाडाचा तुकडा

सध्या सोशल मीडियावर वाघावरील उपचाराचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक रंजक दृश्य पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाघाच्या दातामध्ये एक मोठं हाड अडकल्याचं दिसत आहे. ते हाड काढण्यासाठी वाघाला बेशुद्ध करण्यात आलं आहे, जेणेकरून डॉक्टर त्या वाघाला सुरक्षितपणे मदत करू शकतील. यावेळी डॉक्टरांनी हातोड्याच्या साह्यानं हाड काढण्याचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया जितकी आव्हानात्मक, तितकीच जोखमीचीही होती. परंतु, प्राण्यांची काळजी घेणाऱ्या टीमनं वाघाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत सावधगिरीनं काम केलं. यावेळी काही लोकांनी वाघाचा जबडा उघडला. त्यानंतर डॉक्टरांनी हातोडीनं ठोकून ठोकून त्याच्या दातांत अडकलेलं हाड बाहेर काढलं. हा व्हिडीओ पाहताना फार भयावह वाटतोय.

हा रंजक व्हिडीओ @AMAZlNGNATURE नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. अनेक लोक या वाघाच्या बचावाबाबत आपली मतं मांडत आहेत; तर काही लोक प्राण्यांबद्दल संवेदनशीलता व्यक्त करीत आहेत. प्राण्यांना मदत करणं ही केवळ जबाबदारी नसून मानवाचं कर्तव्यही आहे हे या व्हिडीओनं सिद्ध केलं आहे.

हेही वाचा – Video : “जा, तुझ्या बापाला फोन कर”; मुंबई लोकलमध्ये महिलांचा राडा; छत्री भिरकावत केलं असं काही की, तिनं सीटच सोडली

व्हिडीओ पाहणाऱ्या एका युजरनं लिहिलं की, दंतचिकित्सक माणसांबरोबरही असंच करतात. आणखी एका युजरनं लिहिलं की, वाघही त्याच्या मित्राला म्हणत असेल की… यार, मी आज सर्वांत विचित्र स्वप्न पाहिलं- शैतानांनी घर बनविण्यासाठी वापरात येणाऱ्या अवजारानं माझ्या तोंडातून ते मोठं हाड काढलं आहे. तिसऱ्या युजरनं लिहिलं की, हे जोखमीचं काम केवळ उच्च कुशल टीमच करू शकते.