Tiger Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही, काहीवेळा असे काही व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून आपला आपल्याच डोळ्यांवर विश्वास बसत नाही, सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण चक्क वाघाबरोबर खेळताना दिसतोय. एखादं कुत्रं, मांजर असल्याप्रमाणे तो चक्क वाघाबरोबर मज्जा मस्ती करतोय. इतकंच नाही तर तो वाघाबरोबर असं काही करतो की पाहून तुम्हीही शॉक व्हाल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीच सांगा वन्यप्राण्याबरोबर असं वागणं बरं आहे का?

वाघ बघितल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटतो, त्याला हात लावायची गोष्ट तर दूरच, लांबून बघतानाही भीती वाटते. प्राणिसंग्रहालयातही कधी गेलो आणि त्यावेळी तिथे वाघाने आपल्याकडे कटाक्ष जरी टाकला, तरी आपल्या मनात थोडी तरी का होईना भीती निर्माण होते. पण, या व्हिडीओत एक तरुण वाघाच्या पाठीवर बसून चक्क आरामात फेरफटका मारताना दिसत आहे, जे पाहून तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ पाकिस्तानमधील असल्याची माहिती समोर आली आहे, जो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. अनेकांनी वाघाच्या पाठीवर बसणाऱ्या तरुणावर टीकेची झोड उठवली आहे.

भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, लहान मुलाने आईच्या डोक्यात घातली बॅट; थरारक घटनेचा Video Viral

असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती साखळदंडात बांधलेल्या वाघावर स्वार होताना दिसला आहे. मनाला भिडणाऱ्या या व्हिडीओने लोकांच्या संवेदना उडाल्या आहेत. लोक कमेंट करून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण अगदी घोड्यावर बसल्याप्रमाणे वाघावर बसला आहे आणि वाघही त्याला आरामात पुढे घेऊन जात आहे. यावेळी वाघाला साखळीने बांधलेले आहे. वाघ पुढे जाऊन एका पिंजऱ्याजवळ पोहोचतो, जिथे एक सिंह आणि सिंहीण बंदिस्त असल्याचे दिसतेय. हा व्हिडीओ @nouman.hassan1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, विदेश तेही विशेषतः पाकिस्तानात वाघांना पाळीव प्राणी म्हणून पाळण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. पाकिस्तानातील श्रीमंत वर्गात हा ट्रेंड झपाट्याने वाढत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. या व्हिडीओवर इतरही काही लोकांनी कमेंट करत लिहिलं आहे की, वाघ हा जंगली आणि धोकादायक प्राणी आहे, त्याला अशा प्रकारे बांधून पाळीव प्राणी बनवणं आणि त्याच्यासोबत मस्ती करतानाचा व्हिडीओ बनवून लोकांना प्रोत्साहित करणं खूप चुकीचं आहे; तर काहींनी वाघाला अशाप्रकारे वागवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.