Tiger Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांसंबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ फार मजेशीर आणि विचित्र असतात. त्यामध्ये कधी प्राणी एकमेकांशी भांडण करताना तरी दिसतात किंवा कधी प्राणी खेळताना दिसतात. अनेकदा व्हिडीओं्मयेध माणसे प्राण्यांसह मस्ती करताना किंवा त्यांच्याबरोबर सेल्फी, फोटो घेताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये दोन तरुण वाघाच्या बाजूला बसून फोटो काढत होते. पण, यावेळी अचानक असं काहीतरी घडलं की, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओमध्ये हिरोगिरी करण्याच्या नादात दोन तरुण आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन तरुण वाघाच्या पिंजऱ्यात घुसून, त्याच्याबरोबर फोटो काढत होते. यावेळी दोघेही वाघाच्या अगदी जवळ बसून पोज देत आरामात फोटो काढत होते. तिथे एक माणूस काठी घेऊन, वाघाला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वाघ अचानक संतापतो आणि जोरात डरकाळी फोडतो. वाघाची डरकाळी ऐकून तरुण घाबरतात आणि फोटो काढणं सोडून जीव वाचवण्यासाठी जोरात पळत सुटतात.

हा व्हायरल व्हिडीओ @amazingvideo01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, नक्कीच दोघांना घरदार आठवले असेल. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, वाघाला काठीने डिवचणारा जास्त शहाणा आहे. तिसऱ्याने लिहिले की, वाघाने फाडून खाल्ले असते, तर लक्षात आले असते. तर, काहींनी हे दोघे पिंजऱ्यात गेले तेव्हा वन विभागातील कर्मचारी काय करत होते, असा सवाल केला आहे.