वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. जंगलात त्यांची संख्या २हजारांहून अधिक आहे. ते पूर्णपणे मांसाहारी आहेत आणि म्हणूनच त्यांना वन्य प्राण्यांची शिकार करायला आवडते. कधी डुकरे, कधी कोल्हे, कधी माकडे तर कधी कुत्रे हे त्यांचे खाद्य बनतात. असे प्राणी ते आवडीने खातात. वाघ आणि वाघिणींच्या शिकार करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर रोज व्हायरल होत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाघिणीने केली शिकार

तुम्ही वाघिणीला शिकार करताना पाहिली नसेल तर आज इथे पहा. सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये एक वाघीण रानडुकराची शिकार करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये वाघिणीने रानडुकराला तोंडात पकडून त्याचे मोठे फॅन्सही पकडल्याचे दिसत आहे. रानडुक्कर वाघिणीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो, परंतु बलाढ्य वाघिण त्याला ठार मारते. व्हिडीओमध्ये रानडुकराच्या ओरडण्याचा आजव ऐकू येत आहे.

(हे ही वाचा: Viral: एका छोट्याशा बेडकाकडून महाकाय साप कसा हरला? IAS अधिकाऱ्यांनी शेअर केला संघर्षाचा Video)

(हे ही वाचा: गांजाच्या आहारी गेलेल्या मुलाला आईने दिली शिक्षा; खांबाला बांधून डोळ्यात टाकली मिर्ची पावडर; Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

या व्हिडीओला १२ हजाराहून अधिक लोकांनी बघितलं आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट्सही केल्या आहे. एका युजरने कमेंट केली थरारक दृश्य !!!’ हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tigress grabbed the wild boar he kept screaming for release and watch viral video ttg