Viral video: वाघ हा जंगलातील अत्यंत घातक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो प्रचंड शक्तीशाली आणि चपळ असतो. मोठमोठ्या प्राण्यांना तो सहजरित्या मारू शकतो. वाघाच्या जबड्यात एखादा प्राणी अडकला की मग खुद्द यमराज देखील त्याला वाचवू शकत नाही असं म्हटलं जातं तर वाघिणही तितकीच ताकदवान असते. दुसरीकडे मगर हीसुद्धा अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. काही जणं तर मगरीला पाण्यातील राक्षस असं देखील म्हणतात. एका झटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करण्याची क्षमता मगरीकडे असते. त्यामुळेच वाघ सिंह सुद्धा मगरी असलेल्या तळ्यात पाणी पिण्यासाठी जात नाहीत. सध्या राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध वाघिणी रिद्धीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी रिद्धी वाघिणीनं मगरीची शिकार केली आहे.
सोशल मीडियावर एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये रिद्धी आणि तिची पिल्ले नदीच्या काठावर शांतपणे शिकार करताना दिसत आहेत. वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रसिद्ध वाघिणी रिद्धी आणि तिचे तीन पिल्ल राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या झोन ३ मध्ये मगरीची शिकार करताना. उद्यानात दिसलेली ही एक अत्यंत दुर्मिळ हत्या आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तलावाशेजारी महाकाय मगर दिसतेय यावेळी तिच्या बाजूला वाघीण निवांतपणे तिची शिकार करत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; भररस्त्यात कपडे काढून दारुनं अंघोळ घातली, तेवढ्यात पोलिसांची एन्ट्री अन्…
हा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी पुन्हा शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शन लिहिले की, “तुम्ही वाघाला मगर खाताना पाहिले आहे का? ” व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर अनेक युजर्सनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका यूजरने लिहिले की, धक्कादायक व्हिडिओ. एकीकडे एका यूजरने लिहिले की, “असा नजारा यापूर्वी कधीच पाहिला नाही.” त्याच वेळी, एका वापरकर्त्याने लिहिले की, “किती अद्भुत शिकार होती.”