Tiger Herd Seen in Forest: वाघांची गणना जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. ते खूप हुशार शिकारी सुद्धा आहेत. वाघांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कळपात जास्त दिसत नाहीत, तर सिंह फक्त कळपात फिरतात. याच कारणामुळे जेव्हा सोशल मीडियावर (social viral) वाघांचे संपूर्ण कुटुंब जंगलात एकत्र फिरताना दिसले तेव्हा पाहणारे थक्क झाले.
व्हिडीओमध्ये वाघिणीसोबत इतर पाच वाघांचा कळप आरामात फिरताना दिसत आहे. जणू ते जंगलात फिरायला गेले होते. व्हिडीओचे नेमके ठिकाण कळू शकले नाही, मात्र जंगल सफारीचे हे दृश्य असल्याचे दिसते, तिथे उपस्थित असलेले लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अनेकदा वाघ पाहण्यासाठी थांबावे लागते पण इथे तर वाघांचे संपूर्ण कुटुंबच समोर आले आहे.
(हे ही वाचा: म्हशीचं रेडकू जेव्हा हत्तीला नडतं; मजेशीर viral video ला नेटीझन्सची पसंती)
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जंगलात रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. तितक्यात त्यांच्या समोरून एक वाघीण येते आणि मग एकामागून एक वाघ त्यांच्या मागे येऊ लागतात. एकूण ६ वाघांचा हा कळप पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक अचंबित झाले आहेत. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केला असून त्यासोबत माहितीही दिली आहे. त्यांनी सांगितले की वाघिणी साधारणपणे २-४ मुलांना जन्म देते. ५ मुले असणे ही सामान्य गोष्ट नाही आणि नंतर त्या सर्वांना जगवणे हे आणखी वेगळे आहे कारण त्यांना पोसणे सोपे नाही.
(हे ही वाचा: Viral: आधी पुष्पहार कोण घालणार? यावरून वधू-वर भिडले; नेटीझन्स म्हणतात ‘हे लग्न आहे की रणांगण’)
(हे ही वाचा: Viral: मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक भारतीय ‘भेळपुरी’ आणि ‘शेवपुरी’वर फिदा!)
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
अवघ्या २ दिवसात ५७ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३ हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे. इतके वाघ एकत्र पाहिल्यानंतर बहुतेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले – ही वाघांची दुर्मिळ रांग आहे, तर काही लोकांनी जंगलाचा पत्ताही विचारला आहे.