जंगल हा शब्द कानावर पडला की, पक्षी, प्राणी, कीटक, झाडेझुडपे, डोंगर, माती या सगळ्यांचे एक चित्र अलगद डोळ्यासमोर येते. पण, आता नवीन प्रकल्प, उंच इमारती, कारखान्यांचे बांधकाम आदी अनेक गोष्टींमुळे जंगलतोड मोठ्या प्रमाणात होते आहे. यामुळे पक्षी तर जंगलातील अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये वन अधिकारी यांनी जंगलातील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

आएफएस अधिकारी (वन अधिकारी) प्रवीण कासवान वाईल्डलाईफ फॅक्ट्सबाबत नेहमीच नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. आज त्यांनी पोस्टमध्ये जंगलातील वाघांची प्रजाती एकेकाळी नामशेष होण्याच्या मार्गावर होती असे सांगत एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिलं आहे. फोटोमध्ये जंगलातील तलावात सहा बछडे अंघोळ करीत आहेत आणि याची देखरेख त्यांची आई म्हणजेच वाघीण करीत आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा प्रवीण कासवान यांनी शेअर केलेली ही सुंदर पोस्ट…

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Saif Ali Khan
हल्ल्यानंतरचा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबरचा अनसीन फोटो आला समोर
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”

हेही वाचा…२०२४ मध्ये भारतीय पर्यटक व्हिसाशिवाय ‘या’ सुंदर देशांना देऊ शकतात भेट; तुम्ही कधी करताय प्लॅन?

पोस्ट नक्की बघा…

प्रवीण कासवान यांनी हा फोटो पहिला आणि त्याच्या भावना व्यक्त करीत लिहिले की, ‘अशी दृश्ये प्रत्येक वन संरक्षकाच्या चेहऱ्यावर आनंद देऊन जातात. कल्पना करा की, ही प्रजाती एकदा नामशेष होण्याच्या मार्गावर होती. फोटोत वाघीण तिच्या बछड्यांची देखरेख करते आहे हे पाहून त्यांनी पुढे म्हंटल आहे की, एक वाघीण तिच्या सहा बछड्यांना जंगलातील तलावात आंघोळ करताना पाहते आहे. खरंच मेहनती आई’ ; अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे.

सोशल मीडियावर हा फोटो प्रवीण कासवान यांच्या अधिकृत @ParveenKaswan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला २४ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून वन्यप्रेमी या पोस्टवर विविध शब्दात त्यांच्या भावना कमेंटमध्ये मांडताना दिसून आले आहेत . एकंदरीतच वन अधिकारी यांच्या पोस्टने सोशल मीडियावर अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे

Story img Loader