कॅनडातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॅनडातील प्रसिद्ध टीक-टॉक स्टार मेघा ठाकूरचं २१ व्या वर्षी निधन झालं. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मेघाच्या पालकांनी तिचं निधन झाल्याचं सांगितलं आहे. टीक-टॉकवर ९ लाखांहून अधिक चाहतावर्ग असणाऱ्या मेघाचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. मेघाच्या निधनाची बातमी कळताच तिच्या चाहत्यावर्गात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. २४ नोव्हेंबरला मेघाचं निधन झालं, अशी माहिती तिच्या पालकांनी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामच्या पोस्टद्वारे दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेघाच्या अचानक जाण्यानं संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली आहे. मेघाच्या पालकांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, आमच्या आयुष्यातील एक दिवा, काळजी घेणारी सुंदर मुलगी मेघा ठाकूरचं २४ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास निधन झालं. मेघा एक स्वतंत्र आणि स्वत:वर आत्मविश्वास ठेवणारी तरुण मुलगी होती. आम्ही तिला मिस करू. मेघा तिच्या चाहत्यांवर खूप प्रेम करायची. मेघावर तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच काय ठेवा. तुमच्या प्रार्थनेतून तिला एक नवीन प्रवासाचा मार्ग सापडेल, अशाप्रकारे मेघाच्या आठवणींना उजाळा देत तिच्या पालकांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांकडूनही शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

नक्की वाचा – ‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral

मेघा एक वर्षांची असताना तिचे पालक कॅनडामध्ये राहायला गेले. २०१९ मध्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेतल्यानंतर मेघाने पाश्चिमात्य विद्यापीठात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण सुरु केल्यानंतर मेघाने टीकटॉकवर पदार्पण केलं. तिने डान्सचे जबरस्त व्हिडीओ टीक-टॉकवर शेअर केल्यामुळं तिच्या फॉलोवर्सची संख्या तुफान वाढली. प्रसिद्ध कलाकार कायली जेन्नर आणि बेल्ला हादीद यांच्याही तिच्या व्हिडीओमध्ये समावेश असायचा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiktok star megha thakur died age of 21 in canada her parents shared post on instagram nss