Killer Of The Year: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही पोस्ट आढळल्या ज्यात TIME मासिकाचे पहिले पान म्हणजेच कव्हर दिसत आहे. टाइम मासिकाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा ‘या वर्षीचा मारेकरी’ म्हणजेच किलर ऑफ द इयर, म्हणून उल्लेख केल्याचे दिसत आहे, मुखपृष्ठ आणि आतील मथळ्यात हा दावा करण्यात आल्याचे सुद्धा या पोस्टमध्ये दिसत आहे. तुम्ही बघू शकता कव्हर पेजवर सुद्धा मानवी सांगाड्यांमध्‍ये उभे असलेले नेतान्याहू यांचे फोटो दिसत आहेत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Chay Bowes ने व्हायरल चित्र शेअर केले.

Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
A viral video of a young woman selling pani puri
“१५ -२० सेकंदांची रील आमचे कष्ट दाखवत नाही” पाणी पुरी विकणाऱ्या तरुणीने मांडली व्यथा, VIDEO होतोय व्हायरल
yek number actor vishal sudarshanwar plays raj thackeray role
“तेव्हा समोर स्वत: राजसाहेब बसले होते…”, ‘येक नंबर’मध्ये मनसे अध्यक्षांची भूमिका कोणी साकारलीये? अभिनेता म्हणाला…
Social media influencer and YouTuber is dating a tree and films herself kissing, hugging, and going out with the tree video viral
आधी केली किस मग मारली मिठी अन्…, इन्फ्लूएंसर करतेय चक्क झाडाला डेट! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी

इतर वापरकर्ते देखील समान प्रतिमा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही TIME मासिकाची वेबसाइट तपासून आमचा तपास सुरू केला. सहसा, TIME मासिक ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून नियुक्त करते. या वर्षी TIME ने टेलर स्विफ्टला ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून फिचर केले.

https://time.com/6342806/person-of-the-year-2023-taylor-swift/?utm_source=roundup&utm_campaign=20230202

आम्हाला TIME मासिकाचे मुखपृष्ठ सापडले.

https://time.com/magazine/

यावर तारीख यंदाचीच म्हणजेच २५ डिसेंबर २०२३ होती. त्यानंतर आम्ही फॉरेन्सिकली नावाचे टूल वापरून इमेज रन केली. त्याच्या ‘क्लोन डिटेक्शन’ द्वारे, फॉरेन्सिकली क्लोन टूल कॉपी पेस्ट पर्याय वापरून कॉपी केले गेले असावेत असे वाटणारे भाग हायलाइट करते. आणि आम्हाला फोटोवर काही हायलाइट्स आढळून आल्या.

यामुळे आम्हाला इमेज एडिटेड असल्याचा इशारा मिळाला.

फॉरेन्सिकद्वारे एरर लेवल ऍनालिसिस देखील सूचित करते की फोटो एडिट करण्यात आलेला आहे.

हे ही वाचा<< “पाकिस्तानात मला अत्याचार, जबरदस्ती..”, अंजुने सीमा हैदरला कॉलवर सांगितला भयंकर अनुभव; Video ची खरी बाजू काय?

निष्कर्ष: TIME ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना ‘किलर ऑफ द इयर’ म्हणून नाव दिले नाही. TIME मासिकाच्या मुखपृष्ठावरील व्हायरल फोटो बनावट आहे. तर मूळ फोटो या वर्षीची टाइम पर्सन ऑफ द इयर, गायिका टेलर स्विफ्ट हीच आहे.