Viral video: महागाईच्या या स्पर्धेत प्रत्येकाला त्याचा पगार इतका वाढलेला हवा ज्यातून तो आरामदायी आयुष्य आणि बचत एकसाथ करू शकतो. सध्या महागाई प्रचंड वाढलीय आणि लोकांना त्यांचे दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी सॅलरी इंक्रिमेंटवर सगळ्यांचा फोकस असतो. भारतात बहुतांश लोक खासगी नोकरी करतात. त्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत्र मुख्यत: पगार आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपला पगार कसा वाढेल हे पाहत असतो. यासाठी काहीजण मेहनत करुन बॉसला खूश करतात तर काहीजण लबाडी करुन पुढे जातात. मात्र आता एका तरुणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यामध्ये त्यानं जास्तीत जास्त पगारवाढ कशी मिळवायची? याच्या काही खास टीप्स सांगितल्या आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असं म्हटल जात की, आपण नोकरी समाधानासाठी करतो, पैशासाठी नाही. पण तसं पाहायला गेलं तर नोकरीतील समाधानापेक्षा पगारच महत्वाचा असतो नाही का? रोज उठून कामावर जाण्याची प्रेरणा असते ती महिन्याअखेरीस मिळणारा ‘पगार’! कारण पैसा असेल तरच आपण आपल्या सगळ्या गरजा भागवू शकतो. तुमच्या सगळ्या गरजा भागविण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुवतीनुसार पगार मिळणे आवश्यक असते. हेच हा तरुण सांगतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

हा फोनवर एका व्यक्तीला विचारत आहे की तुम्ही कशी पगारवाढ करुन घेता, त्यावर तो सांगते, फोनवरील व्यक्ती म्हणाला, “माझी पगारवाढ ५० टक्के झाली आहे. अन् माझ्यासाठी हे काही नवं नाही. दरवर्षी मला अशीच पगारवाढ मिळते. यासाठी बॉसच्या प्रत्येक इन्स्टाग्राम पोस्टला मी लाईक करतो. रात्री १२ वाजता जरी बॉसनं मेसेज केला तरी पहिला रिप्लाय मीच देतो, ऑफिसमध्ये कोणीही माझ्यासमोर बॉसबद्दल चुगली करू शकत नाही. कारण मी थेट जाऊन बॉसला सांगतो. बॉस जे बोलेल त्यावर हो बोलतो.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> वयाच्या ५८ व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म; घरातील जल्लोषाचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर भरभरून कमेंट करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips for how to increase your salary funny video viral on social media srk
Show comments