सगळीकडे तापमानाने चाळीशी पार केली आहे. त्यात निवडणुक प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक उमेदावर प्रचारात व्यस्त आहे. अशातच उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने प्रचारासाठी चक्क आपल्या पुतळ्याचा वापर केला आहे. ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी स्वत:चा पुतळा मैदानात उतरवला आहे.

अभिषेक वर्मा डायमंड हार्बर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदार संघात प्रचार करताना त्यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी पुतळ्याचा वापर केला आहे. एका जिप्सीमध्ये अभिषेक यांचा पुतळा आहे. ही जिप्सी प्रचार तरत डायमंड हार्बर या मतदार संघातून फिरत आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर अभिषेक यांच्या पुतळ्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एका श्रृती झा नावाच्या युजर्सनी ही ममता बॅनर्जी यांची आयडिया असू शकते असे म्हटले आहे. तर अन्य एका नेटीझन्सनी या अनोख्या शैलीची स्तुती केली आहे.

Story img Loader