नखे कापण्याचा कंटाळा करणारी, नखे कापण्याआधीच ‘भोंगा’ पसरणारी किंवा नखे कापताना मुद्दाम जोरजोरात ओरडणारी लहान मुलं साधारण प्रत्येक घरात पाहायला मिळतात. मात्र, नखे कापताना बेशुद्ध होण्याचं नाटक करणारा कुत्रा कधी पाहिलाय काय…सोशल मीडियावर सध्या अशाच एका ‘नौटंकीबाज’ कुत्र्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये ‘पिटबुल’ जातीच्या एका कुत्र्याची नखे कापण्याचा प्रयत्न त्याची मालकीण करताना दिसतेय. पण, नेलकटर बाहेर काढून त्याचा पंजा हातात घेताच हा नौटंकीबाज कुत्रा चक्क बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळण्याचं नाटक करताना दिसतोय. नौटंकी करत तो पाय वरती करून हळूहळू मागे पडतो, आणि डोळे उघडेच ठेवतो. काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ ‘रेडिट’ ब्लॉगवर पोस्ट करण्यात आला होता, त्यानंतर तो ट्विटरवर पोस्ट झाला आणि व्हायरल होण्यास सुरुवात झाली. या नौटंकीबाज कुत्र्याचा अभिनय पाहून, ‘यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार यालाच द्यावा’ अशी उपहासात्मक मागणी व्हिडिओ पाहणाऱ्या नेटकऱ्यांकडून केली जात आहे.
पाहा व्हिडिओ –

या ‘नौटंकीबाज’ कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Story img Loader