सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु असल्याने देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. तर इतर राज्यांच्या तुलनेत उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे शरीर गोठवणाऱ्या थंडीपासून आपलं संरक्षण करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात. यासाठी कोणी जाड स्वेटर, स्कार्फ वारतात तर काही लोक थंडीच्या दिवसांमध्ये कारमधून प्रवास करणं पसंत करतात.

मात्र, सध्या दोन मुलांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी अनोख जुगाड केलं आहे, जे पाहून अनेकजण आश्चर्यतकित झाले आहेत. शिवाय इंदूरमधील या दोन तरुणांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण धावत्या बाईकवर शेकोटी पेटवून हात गरम करताना दिसत आहे. तर थंडीपासून बचाव करण्याचा हा नवा उपाय आहे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Uttar Pradesh Kushinagar
Uttar Pradesh Kushinagar : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं
Youth murder, hotspot, Hadapsar area,
पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना
peacocks die of electrical shock in bhadravati city
चंद्रपूर : सर्वांना भुरळ घालणाऱ्या मोराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
schools, America, mobile phones,
विश्लेषण : विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेत शाळा आग्रही का? काही राज्ये कायदा करणार?
Cisf Recruitment 2024 Vacancy At Central Industrial Security Force For Constable Fireman
CISF Recruitment: ‘सीआयएसएफ’मध्ये नोकरी करण्याची थेट संधी; १ हजार १३० पदांसाठी भरती, दर महिना मिळणार ६५ हजार पगार
Ramzhu hit and run case Lack of investigation by police to protect Ritu Malu Nagpur
नागपूर : रामझुला हिट अँड रन प्रकरण; आरोपी रितू मालू धनाढ्य असल्याने पोलिसांकडून तपासात उणिवा…

हेही पाहा- Video: वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सेल्फी काढण्याचा मोह नडला, इच्छा नसताना १५० किमीचा प्रवास घडला

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावर एक मुलगा बाईक चालवत आहे तर मागे बसलेला त्याचा मित्र चालत्या बाईकवर शेकोटी पेटवून त्यापासून शेकताना दिसत आहे. अशा अनोख्या पद्धतीने तो थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोट करताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ indoreviralnews नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा- Video: ‘मार डाला’ गाण्यावर तीन मित्रांनी केलेला डान्स पाहून मुलींनी वाजवल्या टाळ्या पण नवरदेवाला हसू आवरेना

तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘थंडीपासून बचाव करण्यासाठी बाईकवर असले प्रकार करणे म्हणजे आपला जीव गमावण्यासारखे आहे. पेट्रोलमुळे दुचाकीने पेट घेतला असता व दोन्ही तरुणांना धुखापत होण्याची शक्यता होती. एवढी थंडी जाणवत असेल तर घरीच थांबा. या थंडीत घराबाहेर पडण्याची काय गरज आहे?’ तर ‘सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीह करु नये.’ असं एका व्यक्तीने कमेंटमध्ये म्हटलं आहे. मात्र, हा व्हिडिओ अनेकांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे.