Viral Photo: हल्ली लोक कधी काय जुगाड करतील हे सांगता येत नाही. अनेकदा अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता असाच एक फोटो सध्या खूप व्हायरल होतोय; ज्यामध्ये एका व्यक्तीने चक्क त्याच्या कारमध्ये घरातला एसी लावल्याचे दिसत आहे. या व्हायरल फोटोवर अनेक जण मजेशीर कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
कारमध्ये लावला चक्क घरातला एसी
सोशल मीडियावर देसी जुगाड केलेले अनेक व्हिडीओ आपण पाहत असतो. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने कारचा साइड मिरर तुटला म्हणून नवीन आरसा लावण्याऐवजी प्लास्टिकचा आरसा लावला होता. हा देसी जुगाड सोशल मीडियावर नुकताच खूप व्हायरल झाला होता. दरम्यान, अशातच आता आणखी एकानं कारसोबत भन्नाट देसी जुगाड केलेला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये असं दिसतंय की, एका व्यक्तीनं त्याच्या कारच्या खिडकीमध्ये घरातला एसी लावला आहे. त्याशिवाय त्याला खिडकीसोबत व्यवस्थित पॅकदेखील करण्यात आलं आहे.
हेही वाचा : विकृतीपुढे जग हरलं! कारमध्ये खचाखच भरल्या ३० हून अधिक शेळ्या आणि मेंढ्या; VIDEO होतोय व्हायरल
पाहा फोटो:
ही मजेशीर पोस्ट इन्स्टाग्रामवरील @expired.__ या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्याशिवाय ही पोस्ट शेअर करीत फोटोवर “उन्हाळा आला आहे मित्रांनो, यांनी तर जुगाड केला आता तुम्हीपण करा,” असं लिहिण्यात आलं आहे.
या मजेशीर फोटोवर युजरदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय, “हा एसी तर ठीक आहे; पण तो सुरू करण्यासाठी वीज कशी मिळाली?” तर दुसऱ्याने लिहिलेय, “अरे व्वा.. असले देसी जुगाड फक्त भारतातच होऊ शकतात”, तर आणखी एकाने लिहिलेय, “अरे देवा! या जगात किती विचित्र लोक आहेत.”