दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूपच घसरली आहे. हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर प्रदूषणाचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काही भांगामध्ये दोन दिवस शाळाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा दोन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.दरम्यान आनंद महिंद्रा यांनाही यावर भाष्य केलं आहे. त्यांनी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर पोस्ट करत दिल्लीतील प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय सांगितला आहे. शेतातील तण जाळून होणाऱ्या धुरामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे हे न जाळता पुनरुत्पादक शेतीचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे.
आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहले आहे की, “दिल्लीतील प्रदुषणाची समस्या कमी करण्यासाठी पुनरुत्पादक शेतीची (Regenerative Agriculture) आवश्यकता आहे. यामुळे तण जाळण्याला पर्याय मिळेल आणि मातीची उत्पादन क्षमताही यामुळे वाढेल. @nandi_india चे @VikashAbraham मदतीसाठी तयार आहेत. चला तर मग हे करुया.”
पाहा ट्विट
हेही वाचा >> अरे आवरा हिला! तरुणीचा रेल्वे स्टेशनवर विचित्र डान्स; काकाही दचकले, VIDEO एकदा पाहाच
राजधानी दिल्लीत काही क्षेत्रामध्ये प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले आहेत. अनावश्यक बांधकाम आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अद्याप दिल्ली आणि NCR राज्यांमधून सर्व आपत्कालीन उपायांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. अनेक भागात हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ४०० चा टप्पा ओलांडला आहे. याच पार्श्वभूमीवर काही भांगामध्ये शाळाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. धोकादायक प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.