लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. नवरी मुलगी आणि नवरदेवाचे कुटुंबीय, तसेच मित्र त्याचा लग्नसोहळा खास बनवण्यासाठी बरेच काही करतात. कोणी महागड्या गाडीत दाम्पत्याला बसवून वरात काढतो; तर कोणी खास डान्स करून लग्नसोहळा संस्मरणीय बनवतो. अशाच इच्छेतून एका तरुणाने आपल्या मित्राचे लग्न हटके करण्यासाठी लग्नमंडपात चक्क दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांतच्या स्टाईलने एन्ट्री घेतली आणि त्यानंतर त्याने असा काही डान्स केला की, जो पाहून आलेली पाहुणे मंडळीही आनंदी झाली. या लग्न समारंभाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहता येईल की, नवरदेवाच्या मित्राने रजनीकांतच्या 2.0 चित्रपटातील रोबोटच्या गेटअपमध्ये थेट लग्नमंडपात एकदम हटके एन्ट्री घेतली. त्या तरुणाच्या या हटके एन्ट्रीने उपस्थितीत पाहुणे मंडळीही एकदम आनंदी झाली.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपातील स्टेजवर एक जोडपे उभे आहे. तेवढ्यात रोबोट 2.O मधील चिट्टीच्या लूकमध्ये एक तरुण स्टेजवर येतो आणि वराशी हस्तांदोलन करतो. त्याला पाहून नवरदेवालाही आनंद होतो. त्यानंतर तो तरुण भरलग्नमंडपात पाहुण्या मंडळींसमोर डान्स करू लागतो. ही व्यक्ती रोबोट स्टाईलने डान्स करून लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

हा व्हिडीओ @cinemavikatan नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, रजनीकांत फॅन ‘2.0’ सिटीमधील रोबोटच्या गेटअपमध्ये लग्न समारंभात आला होता. या व्हिडीओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले- ही चिट्टी नाही; मिठ्ठी आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा चिट्टी २.० नाही; तर ०.२ आहे. तिसऱ्या युजरने लिहिले- हा स्वस्तातला चिट्टी आहे.