आई जगातील सर्वात मोठा योद्धा आहे असं म्हटलं जातं, कारण तिची तुलना इतर कोणाशीच होऊ शकत नाही. ती स्वत:चा त्रास विसरुन आपल्या मुलांची काळजी घेत असते. आईच्या त्यागाच्या आणि शौर्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आणि पाहात असतो. मग ती आई माणसाची असो वा प्राण्यांची तिचं आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम असतं. शिवाय मुलांच्या रक्षणासाठी ती कितीही मोठ्या संकटाला सामोरी जाते. याचेच एक उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओमध्ये एक भलामोठा साप मांजरीच्या पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मांजर ज्या बिळात बसलेली आहे त्याच बिळाच्या तोंडाला हा साप आल्याचं दिसत आहे. यावेळी तो मांजरीच्या पिल्लावर जोरदार हल्ला करायला जातो, परंतु यावेळी पिल्लाच्या रक्षणासाठी मांजरीन पुढे येते आणि सापावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करते.
व्हिडिओमध्ये धोकादायक साप मांजरीच्या पिल्लांवर हल्ला करण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय सापाला पाहून मांजर तेथून पळून जाते की काय असं सुरुवातीला वाटतं आहे. मात्र आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी ती स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सापावर हल्ला करते. ज्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा साप आणि मांजरीचा हा थरारक व्हिडिओ ट्विटरवर Rainmaker1973 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत २९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर हा व्हिडिओ २१ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. या मांजरीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिलं, “हा खूप धोकादायक व्हिडिओ आहे, पण मांजरीने पिल्लाला नवजीवन दिलं आहे.” तर दुसर्या यूजरने लिहिलं, “आईसारख कोणीही नसतं.”