To To To Viman Go Dance: सोशल मीडियावर अनेक नवनवीन मराठी गाणी व्हायरल होत असतात. ही गाणी ट्रेंडमध्ये असली की सोशल मीडिया इन्फ्लूएंसर्ससह अनेक कलाकारांनाही यावर रील करायचा मोह आवरत नाही. सोशल मीडियावर दररोज काही ना काही ट्रेंड होत असतात. त्यात मराठमोळी गाणी तर भलतीच चर्चेत असतात. ही गाणी असतातही तशीच मजेदार.
गेल्या काही महिन्यांपासून गुलाबी साडी, आप्पाचा विषय लई हार्ड हाय, बाया भुकेल्यान गं, बाया बांगुऱ्या मांगतान गं, नटीनं मारली मिठी अशी गाणी व्हायरल होत आहेत. या गाण्यांवर अनेकांनी डान्स करत आपली कला सादर केली आहे. ही गाणी ट्रेंडमध्ये असल्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच ‘तो तो विमान’ हे गाणंदेखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. सध्या त्याच गाण्यावर एका तरुणीचा डान्स व्हायरल होतोय. ज्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुणी ‘तो तो विमान…’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. अगदी हुबेहूब डान्स स्टेप करत तरुणीने धमाकेदार परफॉरमन्स केला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे आणि कमेंट्स करत तिच्या डान्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
तरुणीचा हा व्हायरल डान्स या @pratikshakadam360 इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ९१ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “फारच सुंदर” तर दुसऱ्याने “वाह्ह, मस्त डान्स केला” अशी कमेंट केली.