तुम्हाला रोज सकाळी चहासोबत ब्रेड किंवा टोस्ट खायला आवडत का ? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी एक धक्कादायक आणि तितकीच किळसवाणी बातमी आहे. कारण टोस्ट तयार करण्यासाठी लागणारे पीठ कामगाराने पायाने तुडवतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्या कामगाराचा संताप आल्याशिवाय राहणार नाही.

हो कारण या कामगाराचे कृत्य म्हणजे हजारो नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. आपण कोणताही पदार्थ घेताना तो ‘महागातला द्या, पण चांगला द्या’ असं दुकानदाराला सांगतो, त्याचं कारण एकचं ते म्हणजे, आपणाला कोणतीहा पदार्थ स्वच्छ असलेला खायला आवडतो. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या मागे असे प्रकार घडत असतील तर बाहेरचं काही खायचं की नाही? असा प्रश्न आता नेटकरी विचारत आहेत.

Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
cashless payment with hand | cashless payment with hand
हात दाखवा शॉपिंग करा ! आता पेमेंटसाठी ना ATM कार्ड, ना कॅश, ना क्यूआर कोडची गरज; पाहा भन्नाट VIDEO
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Papad Chutney Recipe
Papad Chutney : फक्त पाच मिनिटांमध्ये बनवा पापडाची चटणी; ८ ते १० दिवस टिकणार, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO पाहाच
Khari Biscuit Recipe:
Video : घरच्या घरी बनवा चहाबरोबर खायला आवडणारी खारी! ही सोपी रेसिपी एकदा पाहाच
besan cheese toast recipe
सकाळी झटपट नाश्ता बनवायचाय? मग एक वाटी बेसनापासून बनवा ‘ही’ सोपी रेसिपी
methi puri recipe
हिरव्यागार मेथीची टम्म फुगलेली पुरी अशी बनवा! सोपी रेसिपी जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

हेही पाहा- Video: ८८ व्या वर्षी आजोबांचं नशीब पालटलं, जिंकली ५ कोटींची लॉटरी; म्हणाले “३५ ते ४० वर्षापासून…”

शिवाय टोस्टसाठी लागणारे पीठ कामगार पायाने तुडवतानाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली आहे. अनेकदा आपण खाण्याचे पदार्थ कसे बनवले जातात याचा विचार न करता खरेदी करतो आणि चवीने खातो. शिवाय ते चांगल्या पद्धतीनेच बनवले असतील असा अंदाज आपण लावतो. पण आता व्हायरल होणारा व्हिडिओ, अशा लोकांचे डोळे उघडणार आहे, जे दररोज बाहेरचे पदार्थ गुणवत्तेचा विचार न करता खातात. हा व्हिडीओ टोस्ट बनवणाऱ्या कारखान्यातील असल्याचं स्पष्ट दिसत आहे. शिवाय या कामगाराला कोणीतरी त्याचं रेकॉर्डींग करत असल्याचे समजताच तो हाताने पीठ मळायला सुरुवात करतो.

हेही पाहा- Netflix कडून ३ कोटीच्या पॅकेजची मोठी जॉब ऑफर; तुम्हीही करु शकता अर्ज, पाहा काय आहे काम?

खरंतर, खारी किंवा टोस्ट बनवण्यासाठी आधी पीठ मळावे लागते आणि कारखान्यांमध्ये हे काम मशिनद्वारे केले जाते हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु व्हिडिओमध्ये एक कामगार हातांऐवजी चक्क पायाने हे पीठ मळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्या कामगाराचा संताप येईल. पायाने पीठ मळणाऱ्या या मजुराचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांना धक्का बसला आहे.

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या कामगाराला तो पायाने पीठ मळत असल्याचं कोणी बघत आहे हे समजताच तो हाताने पीठ मळायला लागल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरी या कामगारासह त्याच्या मालकावर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, ही घटना नेमकी कठे घडली आहे. याबाबतची माहिती अद्याप कळालेली नाही.

Story img Loader