सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही लोक डान्स, गाण्याचे व्हिडीओ शेअर करतात तर काही लोक हटके गोष्टी शेअर करताना दिसतात. सध्या एक नवीन ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. अनेक तरुण मंडळी हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभे असतात आणि त्या पाटीवर कधी प्रेरणादायी तर कधी मजेशीर मेसेज लिहितात. मेसेज लिहिलेली पाटी येणारे जाणारे लोक वाचतात आणि त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद होतात. असे तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे. या पाटीवर त्याने भन्नाट मेसेज लिहिला आहे. त्याने नेमके काय लिहिलेय, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“आजच्या काळातला हुंडा म्हणजे…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण रस्त्यावर लोकांच्या गर्दीत उभा दिसत आहे. त्याच्या हातात पाटी आहे. या पाटीवर त्याने एक मेसेज लिहिला आहे. हा मेसेज वाचून कोणीही थक्क होईल. या पाटीवर लिहिलेय,
आजच्या काळातला हुंडा
चांगला पगार, स्वत:च घर
चारचाकी”
या पाटीच्या मागच्या बाजुला पुढे लिहिले, “आणि आई वडिल पण नको”

येणारे जाणारे हा मेसेज वाचताना दिसत आहे. हा मेसेज वाचून अनेक तरुण भावुक झाले आहेत. अनेक तरुणांना या तरुणाचा हा मेसेज पटला आहे. काही तरुणांनी या तरुणाजवळ जाऊन हँडशेक केला आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

punecha_memewala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “खरंय ना मित्रांनो” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पोटगी प्रथा बंद झाली पाहिजे, लग्न पैशाबरोबर होत आहे असं वाटतं” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम खरंय” अनेक युजर्सना तरुणाचा हा मेसेज पटला असून त्यांनी सहमती दर्शवली आहे.